मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शुक्रवार दि. १६ आणि शनिवार दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.
१८ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन’ साजरा करण्यात येतो. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज कसे चालू आहे. तसेच मदरशांच्या आधुनिकीकरणासाठीच्या कोणत्या योजना राबविण्यात येत आहेत, अल्पसंख्याक महिला बचतगटांच्या योजना, अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठीच्या शैक्षणिक योजना, अल्पसंख्याक बहुलक्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठीच्या योजना, मुलींसाठी वसतिगृह व शिष्यवृत्ती योजना यांची सविस्तर माहिती अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ. यादव यांनी या मुलाखतीत दिली आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
0000
जयश्री कोल्हे/स.सं