• Sat. Nov 16th, 2024
    प्रचारगीतातून ‘हिंदू धर्म’ काढायला लावलं, फडणवीसांचं ‘धर्मयुद्ध’ चालतं? ठाकरेंचा आयोगाला सवाल

    Uddhav Thackeray Nashik Rally : ‘धर्मयुद्ध आयोगाला चालते का ?’ असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरे यांनी धर्माच्या नावाने नव्हे, तर स्वतःच्या कर्माच्या नावे मते मागा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाला केले

    महाराष्ट्र टाइम्स

    नाशिक : ‘लोकसभेत शिवसेनेच्या प्रचारगीतातून ‘हिंदू धर्म’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ हे शब्द काढायला लावणारा निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर आहे. परंतु, आता विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसच मतांचे धर्मयुद्ध करा, असे आवाहन जनतेला करीत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी आमचे शब्द गीतातून काढण्यास सांगणारा निवडणूक आयोग आता कुठे गेला आहे?’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील प्रचारसभेत केला आहे.

    काय म्हणाले उद्धव ठाकरे?

    ‘धर्मयुद्ध आयोगाला चालते का ?’ असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरे यांनी धर्माच्या नावाने नव्हे, तर स्वतःच्या कर्माच्या नावे मते मागा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाला केले आहे. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी स्वतःची कर्म काय आहेत ती तपासली पाहिजेत. तुमचे एवढेच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते, तर आमचे सरकार का पाडले, शिवसेना का फोडली? आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला शब्द अमित शहा यांनी का फिरवला,’ असे प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केले.
    Devendra Fadnavis : २०१९ नंतर राजकारणात काहीच अशक्य नसतं, उद्धव ठाकरेंसोबत… फडणवीसांचं इंटरेस्टिंग उत्तर
    ‘भाजपने निवडणुकीत संथ गतीने मतदान होऊ द्या, अशा सूचना केल्या होत्या,’ असा आरोपही त्यांनी केला. ‘तुमची हिंमत असेल, तर निवडणूक आयोग ईडी, सीबीआय बाजूला ठेवून समोरासमोर या,’ असे आव्हानही त्यांनी दिले.

    Ashok Murtadak : राज ठाकरेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का, जवळच्या नेत्याने ऐन विधानसभेत साथ सोडली, शिवबंधन हाती

    राज्यद्रोह्यांना मत नको

    ‘महायुतीचे नेते महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहायला निघाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र द्रोह्यांना मत म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी, असे सांगत भाजप, मिंधे आणि अजित पवारच्या कार्यकत्यांनी यांना मते देऊ नयेत’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. ‘माझ्या अंगात प्राण आहे, तोपर्यंत यांना महाराष्ट्र लुटू देणार नाही, असे सांगत आम्ही शिवसेनेची भाजप होऊ दिली नाही, तर काँग्रेस कुठून होऊ देऊ’, असे प्रत्युत्तरही भाजपला दिले. पोलिसांनो, तुम्ही दहा दिवस थांबा, राज्यात आमचेच सरकार येणार आहे. मिंधेंसह त्यांच्या साथीदारांना तुरुंगात टाकू, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed