Vikram Nagare joins Shiv Sena UBT : वंचित बहुजन समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेविका इंदूबाई नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिरे यांच्यासह भाजप कामगार आघाडीचा नेता विक्रम नागरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘उबाठा’त प्रवेश केला आहे.
महाविकास आघाडीचे नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवार सुधाकर बडगुजर व नाशिक मध्य मतदारसंघातील वसंत गिते यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आले होते. त्या वेळी पवन पवार व विक्रम नागरे यांनी राऊत यांची भेट घेतली होती. या वेळी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा मनोदय पवार यांनी बोलून दाखविला, तर नागरे यांनीदेखील
ठाकरे गटात प्रवेशाची तयारी दर्शविली. नाराजी दूर होत नसल्याने आम्ही भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे नागरे यांनी सांगितले होते.
Ashok Murtadak : राज ठाकरेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का, जवळच्या नेत्याने ऐन विधानसभेत साथ सोडली, शिवबंधन हाती
त्यानंतर शुक्रवारी (दि. १५) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पवार आणि नागरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी नागरे यांच्या आई माजी नगरसेविका इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
Uddhav Thackeray : भाजपमधील मायलेकाची जोडगोळी ठाकरे गटात, एक लाख मतं घेणारा वंचित नेताही शिवबंधनात
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा केस बंद, गैरसमजातून गुन्हा नोंदवल्याचा अहवाल
पवन पवार, नागरेंची तडीपारी अन् पक्षप्रवेश
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार असलेल्या पवन पवार यांनी तब्बल एक लाख ९ हजार ९८१ मतं मिळविली होती. नाशिक पूर्व व देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पवार यांच्या प्रवेशामुळे फायदा होण्याची शक्यता आहे, तर नाशिक पश्चिम मतदारसंघातील सातपूर परिसरात विक्रम नागरेच्या प्रवेशाने सुधाकर बडगुजर यांना फायदा होण्याची शक्यता आहे. पवार, नागरे यांच्यावर काही तास अगोदरच तडीपारीची कारवाई झाली आहे.