• Sat. Nov 16th, 2024
    टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट

    मुंबईत एका पोलीस शिपायावर टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गणेश अशोक शिंदे असे या शिपायाचे नाव आहे. मतदानाची गोपनियता भंग झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठा गोंधळ झाला होता.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई, पाचेंद्रकुमार टेंभरे : राज्यात विधानसभेचा निवडणुका 20 तारखेला पार पडत आहेत. त्यापूर्वी टपाली मतपत्रिकेला सुरूवात झालीये. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी आता पोलिस शिपाईवर कारवाई करण्यात आलीये. पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी 231 आष्टी विधानसभा मतदार संघ जिल्हा बीड येथील मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेव्दार आपले मतदान केले. मात्र, यावेळी त्यांनी फोनमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.

    टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने कायदेशीर आदेशाची अवज्ञा झाली तसेच मतदानाची गोपनियता भंग झाल्यामुळे आता गणेश शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलीये. याची माहिती 185 मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली. सोशल मीडियावर फोटो शेअर करणे गणेश शिंदे यांच्य अंगलट आल्याचे बघायला मिळतंय.
    ‘फडणवीसांच्या मनातील तो डाव फसल्याने खोट्या बातम्या पसरवत आहेत’; असीम सरोदेंची गंभीर टीकामलबार हिल मतदार संघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नी रोड मुंबई येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. तिथून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून हे मतदान करत आहेत. या सेंटरमधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सदर घटना घडली आहे.

    टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट, मुंबईत पोलिस शिपायावर गुन्हा

    सर्व मतदारांना मतदान केंद्रावर फोन वापरण्यास पुर्णपणे बंदी असल्याबाबत तसेच मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन सदरचा लिफाफा बंद करून केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते. अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रसन्न मधुसुदन तांबे यांनी दिली. पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed