• Sat. Nov 16th, 2024

    ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेत तीन टक्‍के निधी राखीव – सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Dec 14, 2022
    ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेत तीन टक्‍के निधी राखीव – सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबईदि. 14 : राज्‍यातील गड-किल्‍लेमंदिरे व महत्‍वाची संरक्षित स्‍मारके इत्‍यादींच्‍या संवर्धनासाठी जिल्‍हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील तीन वर्षासाठी ३ टक्‍के निधीची तरतूद करण्‍यासाठी शासन मान्‍यता देण्‍यात आली आहे.

                याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने १४ डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित केला आहे.  सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नियोजन विभागाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्‍ट्राच्‍या पुरातन व सांस्‍कृतिक परंपरेचे व वारशाचे जतन करण्‍यासंदर्भात घेतलेल्‍या या निर्णयाबद्दल सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री तथा नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्‍यक्‍त केले आहेत. या निर्णया अंतर्गत तीन वर्षात एक हजार कोटी रुपये  निधी उपलब्ध होणार आहेत.

                महाराष्‍ट्राला प्राचीन सांस्‍कृतिक परंपरा लाभलेल्‍या असूनत्‍यात कातळात खोदलेल्‍या जागतिक वारसा म्‍हणून सुप्रसिध्‍द अशा अजिंठा-वेरुळ लेण्‍यारायगड व सिंधुदुर्ग यासारखे किल्‍लेयादव व मराठा काळात उभी राहिलेली व सुंदर शिल्‍पाकृतींनी नटलेली गडचिरोली जिल्ह्यातील श्री मार्कंडेय व श्री त्र्यंबकेश्‍वर यासारखी मंदिरेचंद्रपूरबल्लारपूर येथील किल्लेराजुरा येथील श्री सिध्देश्वर मंदिरभद्रावती येथील विजासन लेणीमध्‍ययुगीन दर्गे व मकबरे तसेच वसाहत कालीन स्‍थापत्‍यांचा समावेश आहे. ऐतिहासिक व प्राचीन स्‍मारकांपैकी केंद्र सरकारद्वारा भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण मार्फत २८८ स्‍मारके राष्‍ट्रीय महत्‍वाची म्‍हणून जतन केली आहेत. तसेचमहाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागाने पुरातत्‍व व वस्‍तुसंग्रहालये संचालनालयामार्फत ३८७ स्‍मारके संरक्षित म्‍हणून घोषित केलेली आहेत. यामध्‍ये घटोत्‍कच व धाराशीव ही लेणीराजगडसिंहगडमाणिकगड यांच्‍यासारखे किल्‍ले तसेच गड जेजूरीनिरानृसिंहपूरश्री तुळजाभवानी यांसारखी मंदिरेलोकमान्‍य टिळकस्‍वातंत्र्यवीर सावरकर आदी महापुरुषांची जन्‍मस्‍थळे व गेट वे ऑफ इंडिया अशा स्‍मारकांचा समावेश आहे. राज्‍यस्‍तरीय योजनांमध्‍ये सर्व संरक्षित स्‍मारकांचे संवर्धन करण्‍यासाठी उपलब्‍ध असलेला निधी कमी असल्‍यानेस्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची बाब शासनाच्‍या विचाराधीन होती.

                 यासंदर्भात सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना यापूर्वी विनंती केली होती, तर उपमुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली होती. या संदर्भातील सविस्‍तर मार्गदर्शक सूचना पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागाकडून निर्गमित करण्‍यात येणार आहेत.

    ००००

    वर्षा आंधळे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed