• Mon. Nov 25th, 2024

    केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – हंसराज अहीर

    ByMH LIVE NEWS

    Dec 2, 2022
    केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – हंसराज अहीर

    नवी दिल्ली, २ : केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सांगीतले. येथील केंद्रीय केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार श्री. अहीर यांनी स्वीकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

    श्री. अहीर म्हणाले की,  देशभरात इतर मागासवर्गात सुमारे अडीच हजार जाती आहेत. पोट जातींसह ५ हजार ५०० जाती इतर मागासवर्गात मोडतात. देशातील बहुतेक सर्वच राज्यांमध्ये मोठ्या संख्येने इतर मागासवर्ग जातीत मोडणारे लोक आहेत. या सर्व बांधवांचा  सामाजिक, शैक्षणिक, आर्थ‍िक, सांस्कृतिक अशा सर्वांगीण विकासासाठी मागासवर्ग आयोग कार्यरत असून त्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करणार.

    शासकीय योजनांचा लाभ देशातील सर्वच स्तरातील मागासवर्गापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे या देशातील विषमता, असमानता संपविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भारतीय संविधानात हे अंर्तभूत आहे. त्याचप्रमाणे इतर मागास जातीतील सर्व वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *