• Thu. Nov 28th, 2024

    मराठीच्या विकासासाठी एकत्रितरित्या कार्य करणे गरजेचे – माजी खासदार, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर

    ByMH LIVE NEWS

    Nov 17, 2022
    मराठीच्या विकासासाठी एकत्रितरित्या कार्य करणे गरजेचे – माजी खासदार, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर

    मुंबई, दि. 17 : ग्रंथालये ही मराठी वाचन संस्कृतीचेविचार मंथनाचेसाहित्याचेनाटक-शास्त्राचेभावजीवनाची केंद्र व्हावीत. मराठीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितरित्या कार्य करावे, असे प्रतिपादन माजी खासदार, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

    उच्च व तंत्र शिक्षण विभागग्रंथालय संचालनालयजिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवादरम्यान देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदान करण्यात आले. यावेळी साहित्यिकशिक्षणतज्ज्ञमाजी खासदार डॉ. मुणगेकर बोलत होते.

    मराठीतील दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उद्घाटन केले. या प्रदर्शनात विविध भाषांतील तसेच मराठीतील २०० पेक्षा अधीक काळ जुने ग्रंथ ठेवले आहेत.

    कार्यक्रमाला राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दिलीप बलसेकरव्याख्याते प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुंभार आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    श्री.मुणगेकर म्हणाले कीमराठीच्या वाढीसाठी मुंबई ग्रंथालयाने अधिक कार्यक्रम करावेत. वाचनप्रेमी निर्माण करावेत. २०० वर्षे जुने ग्रंथ आणि सर्वांत जास्त ग्रंथसंपदा या ग्रंथालयात आहे. या ग्रंथांतील विचार सर्वदूर पोहोचविणे गरजेचे असूनत्यांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

    डॉ. बलसेकर म्हणाले कीमाहिती व तंत्रज्ञान युगात आपण कार्यरत आहोत. मात्रग्रंथांशिवाय पर्याय नाही.  वाचन संस्कृती रूजविणे आणि वाढविणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे ७५ समाजसुधारक आणि विचारवंत हे पुस्तक आपण लवकरच प्रकाशित करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    ग्रंथोत्सवात बालकथांपासूनशासकीय ग्रंथलोकनेत्यांचे चरित्रमहापुरूषांची आत्मचरित्रविज्ञान आधारित कथास्त्री प्रधान साहित्यसंत साहित्यराजकारणपत्रकार लिखीत पुस्तकेछत्रपती शिवाजी महाराजांची गाथाप्रबोधनकारगांधीजीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्यकविताअभंगललितगुढ कथाभारतीय साहित्याच्या निर्मात्यांची ओळखनवतंत्रज्ञानपत्रकारिताराज्याचा इतिहास उलगडणारे साहित्य असे विविध ग्रंथ विद्यार्थ्यांना पहायला मिळाली.

    ०००

    श्रद्धा मेश्राम/ससं/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed