• Thu. Nov 28th, 2024

    सामाजिक व आर्थिक समालोचन २०२२ मुंबई उपनगर जिल्हा पुस्तकाचे प्रकाशन

    ByMH LIVE NEWS

    Nov 11, 2022
    सामाजिक व आर्थिक समालोचन २०२२ मुंबई उपनगर जिल्हा पुस्तकाचे प्रकाशन

    मुंबईदि. 11 : जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2022मुंबई उपनगर जिल्हा या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई उपनगर च्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.  

    जिल्हा सांख्यिकी कार्यालयमुंबई उपनगर मार्फत सन 2021-22 साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक व आर्थिक बाबींसंबंधीची माहिती एकत्रित करुन जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन2022 हे प्रकाशन तयार करण्यात आले आहे.

    यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडेजिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक प्रांजली वाठसहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे,   तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

    जिल्हा सांख्यिकी कार्यालयमुंबई उपनगर मार्फत जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हे वार्षिक जिल्हास्तरीय सांख्यिकी प्रकाशन प्रकाशित केले जाते. या प्रकाशनात शिक्षणसार्वजनिक आरोग्यवाहतूक व दळणवळणमहिला व बाल विकास इ. विविध विकास क्षेत्रे तसेच जिल्हा उत्पन्नस्थानिक स्वराज्य संस्थाचे उत्पन्न/खर्चजीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीविविध स्त्रोतातून जमा होणारा महसूलनिवडणूक विषयक आकडेवारीलोकसंख्या इ. सामाजिक क्षेत्रातील महत्वाच्या बाबींवरील माहितीचा या पुस्तकाचा समावेश आहे.

    या प्रकाशनामध्ये एकूण 117 विषयांचा समावेश असून असून त्यातील माहिती शासकीय व निमशासकीय अशा 65 यंत्रणांकडून मागविण्यात येते. जिल्हास्तरीय योजनांचा आराखडा तयार करणेयोजनानिहाय आर्थिक व भौतिक उद्दिष्टे निश्चित करणेजिल्ह्याच्या विविध योजना राबविणेमानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यांची निवड करणे व इतर अनेक प्रशासकीय बाबींसाठी प्रकाशनातील आकडेवारीचा उपयोग शासनास होतो.

    जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2022 हे प्रकाशन मराठी मध्ये https://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    ****

    संध्या गरवारे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed