राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमधील घडामोडींबाबत मोठा खुलासा केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का? हा प्रश्न वारंवार महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत येतो. आमदार रोहित पवार यांनीदेखील एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना याबाबत भाष्य केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा थांबल्या असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षांच्या नेतेमंडळींकडून आधीच सांगण्यात आलं आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि त्यांचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे जाणार होते, असा मोठा खुलासा युगेंद्र पवार यांनी केला आहे.
युगेंद्र पवार नेमकं काय म्हणाले?
“दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असतानाची परिस्थिती वेगळी होती. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. या दोन्ही परिस्थितीमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. दादा होते तेव्हा दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंबंधीच्या चर्चा सुरू होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक होणार होता. या पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजितदादांकडेच जाणार होते. मात्र आता विलीनीकरणावर बोलण्यासाठी मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. परंतु सध्या तरी या चर्चा थांबल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू असेल तर त्याची माहिती मला नाही”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी मांडली.
Shiv Sena Case : चिन्हाचा विषय तेव्हा राजकीय पक्षच महत्त्वाचा, सुप्रीम कोर्टाची मोठी टिपण्णी, सुनावणी उत्कंठावर्धक वळणावर
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवर भाष्य
बारामतीत आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती युगेंद्र पवार यांनी घेतल्या. यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. युगेंद्र पुढे म्हणाले, “माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी तुमचे उमेदवार घेतो असे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही. शेवटच्या काही क्षणांमध्ये आम्हाला आमचे पॅनल उभे करावे लागले. परंतु सध्याची परिस्थिती वेगळी आहे. सुरुवातीपासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र पॅनल देऊन निवडणूक लढवावी अशी भावना आहे.”
“या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार देखील लक्ष घालतील. सर्वच वरिष्ठ नेते आम्हाला ताकद देतील, असा विश्वास आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आम्ही कारखाना कार्यक्षेत्रांमध्ये एखादी प्रचार सभा घ्यावी, अशी विनंती करणार आहोत”, अशी माहिती युगेंद्र पवार यांनी दिली.
Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं, म्हणाले, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने नाव जोडण्याचा प्रयत्न
निवडणुकीत कुणासोबत मैत्री करणार?
“सध्या तरी कोणाकडूनही युती अथवा आघाडीचा प्रस्ताव आला नाही. तसा प्रस्ताव आला तर त्यावर विचार करू. मात्र सध्या आम्ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत. आणखीन बराच कालावधी आहे. या दरम्यान काय घडते ते पाहूया”, असं युगेंद्र पवार म्हणाले. दरम्यान, कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गटांमधील १३० ते १४० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहे.
Santosh Pandit Bail : कोर्टात जोरदार युक्तिवाद, अखेर संतोष पंडित यांना जामीन मंजूर; पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय
युगेंद्र पवार आणखी काय म्हणाले?
“सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. सध्या तरी आमच्यासमोर युती अथवा आघाडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. या निवडणुकीमध्ये आम्ही शरद पवारांना एखादी प्रचार सभा घेण्याची विनंती करणार आहोत. तसेच आमदार रोहित पवार व खासदार सुप्रिया सुळे हे देखील या निवडणुकीमध्ये निश्चित मदत करतील”, असं युगेंद्र पवार म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा