• Wed. Nov 27th, 2024

    कपिलधार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री अतुल सावे

    ByMH LIVE NEWS

    Nov 7, 2022
    कपिलधार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री अतुल सावे

    बीड, दि.07:- महाराष्ट्रासह तेलंगाना , आंध्र प्रदेश व कर्नाटक येथील  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे प्रचंड मोठ्या संख्येने भाविक येत असतात या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मंजूर निधी उपलब्ध करून देतानाच येथे चांगल्या सुविधा निर्माण करण्याकडे पूर्ण लक्ष दिले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले

    पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्रीक्षेत्र कपिलधार येथील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरात शासकीय महापूजा संपन्न झाली. यानंतर झालेल्या सत्कार सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज अहमदपूरकर , गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज, गुरुवर्य महादेव स्वामी महाराज , गुरुवर्य म्हैसाळकर महाराज यांचे सह श्री बसवराज मंगरूळे, श्री राजेंद्र मस्के , श्री अक्षय मुंदडा,शिवा संघटनेचे श्री मनोहर धोंडे ,  श्री वसंत मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    पालकमंत्री श्री.सावे म्हणाले, कपिलधार येथील शासकीय महापूजा माझ्या हस्ते होत असून हा माझा मोठा सन्मान आहे. येथील विकासासाठी यापूर्वी सुधीर मनगुंटीवार यांनी मंजूर केलेल्या अकरा कोटी रुपयेच्या पैकी चार कोटी रुपयांचे विकासकामे यापूर्वी झाले आहेत तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने येथील विकासासाठी 100 कोटी रुपयांचा विकास का आराखडा देखील सादर करण्यात आला आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल येथे भाविकांसाठी सुविधा निर्माण करतानाच विविध राज्यातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पर्यटनाच्या दृष्टीने देखील आनंद देता येईल या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी  सांगितले.

    कपिलधार येथे आगमन झाल्यानंतर श्रीक्षेत्र कपिलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी मंत्री महोदय व त्यांच्या समवेत आलेले जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि विविध मान्यवरांचा संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंत्री महोदयांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून महापूजा व आरती झाली.

    महापूजेनंतर तीर्थक्षेत्राच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवा संघटनेच्या वतीने प्रा.मनोहर धोंडे यांनी मंत्री अतुल सावे यांचा स्मृतिचिन्ह, उपरणे व पुष्पहार घालून सत्कार केला. तसेच प्रा. धोंडे प्रास्ताविक करून विविध मागण्या मांडल्या. मंत्री महोदयांच्या हस्ते संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवाभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed