• Mon. Sep 21st, 2026

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजारांची दिवाळी भेट

ByMH LIVE NEWS

Oct 19, 2022
एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजारांची दिवाळी भेट

मुंबई,  दि. १९ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी – कर्मचारी वर्गाला होणार आहे. दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला  दिवाळी भेट म्हणून ५ हजार रुपये देण्याचा  निर्णय घेतला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही श्री. चन्ने यांनी सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

वृत्त क्र. 3005

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed