• Fri. Nov 15th, 2024

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे अंत्यदर्शन

    ByMH LIVE NEWS

    Oct 8, 2022
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे अंत्यदर्शन

    नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा): अखिल भारतीय आखाडा परिषदचे माजी अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे आज आज पहाटे निधन झाले. श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संघ त्र्यंबकेश्वर येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

    यावेळी बंदरे व खनिकर्म तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिशा मित्तल, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावरे, तहसिलदार दिपक गिरासे,  प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

    महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील देवाची वाडी हे असून मृत्यूसमयी त्यांचे वय 95 वर्ष होते. त्र्यंबकेश्वर येथील २००३ व २०१५ सालच्या कुंभमेळाचे ते अध्यक्ष होते. भारतात सर्व ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्यात महाराजांचा सक्रिय सहभाग होता. संत गाडगे महाराज यांच्या सहवासात त्यांनी काही दिवस वास्तव्य केलेले होते. महंत सागरानंद सरस्वती महाराज हे त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे गेल्या २५ वर्षापासून अध्यक्ष होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed