Nanded Marathi News : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठक झाली. या दुष्काळी बैठकीत एक संतापजनक प्रकार समोर आला. दुष्काळासारख्या संवेदनशील मुद्द्यावर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी चर्चा करण्याआधी चक्क काजू बदामावर ताव मारला.
दत्तात्रय भरणे वाद कृषिमंत्री काजू बदनाम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : राज्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी आलेले राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये पार पडलेली बैठक एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आली आहे. दुष्काळी परिस्थितीवर गंभीर चर्चा होणे अपेक्षित असताना, बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी टेबलवर ठेवलेल्या काजू आणि बदामांवर मारलेला डल्ला कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
एकीकडे दुष्काळ परिस्थिती, पीक करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. मदत कधी मिळणार अशी अपेक्षा असताना लोकप्रतिनिधी दुष्काळी बैठकीत लोकप्रतिनिधींसाठी काजू बदामची मेजवानी ठेवल्यानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी परभणीचे खासदार बंडू जाधव यांना प्रश्न विचारल्यानंतर ते पत्रकारांवर भडकल्याचं पाहायला मिळालं.
Vasai Crime : मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख, लग्नासाठी शारीरिक सुसंगततेसाठी तरुणीला प्लेबॉयशी संबंध ठेवण्याची अट, प्लेबॉय अन् आरोपी एकच; धक्कादायक खुलासा
दुष्काळ परिस्थितीचा आढावा
नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला कृषीमंत्री दत्ता भरणे, परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्यासह जिल्ह्यातील आणि विभागातील अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचा तुटवडा आणि दुष्काळी उपाययोजनांवर चर्चा सुरू असतानाच, लोकप्रतिनिधींचं लक्ष मात्र समोर ठेवलेल्या काजू-बदाम यावर केंद्रित झालं होतं.
काजू-बदामांवर मारलेल्या या डल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
लोकप्रतिनिधींनी काजू-बदामांवर मारलेल्या या डल्ल्याचा व्हिडिओ बैठकीत उपस्थित असलेल्या काही उपस्थितांनी टिपला आणि तो अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींचं हे वर्तन पाहून सर्वसामान्यांमधून आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी या व्हायरल व्हिडिओबाबत आणि लोकप्रतिनिधींच्या वर्तनाबाबत परभणीचे खासदार बंडू जाधव यांना जाब विचारला. त्यावर उत्तर देण्याऐवजी खासदार बंडू जाधव पत्रकारांवर चांगलेच भडकले. ते म्हणाले की, ‘समोर ठेवल्यानंतर कोणी खात नाही का?’, असा अजब आणि बेजबाबदार दावा करत त्यांनी या प्रकाराचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी संकटात असताना लोकप्रतिनिधींच्या या अशा अजब उत्तराबद्दल आणि वर्तनाबद्दल जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, राजकीय वर्तुळातही या घटनेवरून जोरदार चर्चा रंगली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा