• Sat. Sep 19th, 2026

Kalyan News : पाकिस्तानात राहून आलेल्या इसमाला मलंगगडावर बेड्या, पाकिस्तानी पासपोर्ट काढल्याचं समोर, मुंबई एटीएसकडून तपास सुरु

पाकिस्तानात चार ते पाच वर्षे राहून आलेल्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने पाकिस्तानात राहून तिथला पासपोर्ट काढल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याने भारतात आल्यानंतर काही दिवसांनी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केल्याचं देखील समोर आलं. याचमुळे तो पकडला गेला आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिसांसह मुंबई एटीएसकडून समांतर तपास केला जात आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कल्याण : कल्याण पूर्वेत स्टेशनपासून जवळपास 15 ते 20 किमी अंतरावर असणाऱ्या मलंगगडावरुन एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. हा इसम पाकिस्तानात गेला होता. तिथे तो चार ते पाच वर्ष राहून आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तो भारतातून पाकिस्तानात भारताच्या पासपोर्टवर गेला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात त्याच्या नातेवाईकांकडे काही वर्षे राहिला. तिथे त्याने पाकिस्तानचा पासपोर्ट बनवला. त्या पासपोर्टच्या आधारावर तो भारतात आला. यानंतर त्याने भारतात भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला. पण पासपोर्ट विभागाला संशय आल्यानंतर या इसमाचं पितळ उघडं झालं आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने या प्रकरणी हिललाईन पोलिसांसह मुंबई एटीएसकडून या प्रकरणाचा आता स्वतंत्र तपास सुरु करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानात वास्तव्य करुन बनावट नावानं पाकिस्तानी पासपोर्ट काढणाऱ्या भारतीय इसमाला मलंगगडावर हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा मुंबई एटीएसकडूनही स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे. या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव किंवा ओळख पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही. मात्र त्याचा जन्म मलंगगड परिसरात झाला असून काही वर्षांपूर्वी तो भारतीय पासपोर्टवर पाकिस्तानात नातेवाईकांकडे गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याने चार ते पाच वर्ष पाकिस्तानात वास्तव्य करून आधी भारतीय पासपोर्ट नष्ट केला आणि मग बनावट नावाने पाकिस्तानी पासपोर्ट काढला होता.

आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या पासपोर्टवर तो नंतर भारतात आला होता. इथे आल्यानंतर काही दिवसांनी त्याने पुन्हा एकदा भारतीय पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केला होता. मात्र हा व्यक्ती पाकिस्तानी पासपोर्टवर भारतात दाखल झाल्याचं पासपोर्ट विभागाच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानुसार हिललाईन पोलिसांनी 2 ते 3 दिवसांपूर्वी या इसमाला मलंगगडावरून ताब्यात घेत पारपत्र अधिनियमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे.

Maharashtra TimesMaharashtra Rain : महाराष्ट्रात मोठा पाऊस येणार की नाही? पावसाची नेमकी तूट किती? हवामान शास्त्रज्ञांनी आकडेवारी सांगत वास्तव मांडलं

पोलिसांकडून एटीएसला माहिती

दरम्यान, हा इसम पाकिस्तानात राहून आलेला असल्याने, तसेच त्याने पाकिस्तानी पासपोर्टही काढलेला असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मुंबई एटीएसला देखील याबाबतची माहिती कळवली आहे. त्यानुसार सध्या मुंबई एटीएसकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्याची संवेदनशीलता लक्षात घेत या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रं, एफआयआरची कॉपी, आरोपीचा फोटो किंवा ओळख उघड करण्यास पोलिसांनी तूर्तास नकार दिला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा