Dr Manisha Jejurkar Death Case : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचा प्रमुख डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर याला पत्नी डॉ. मनीषा जेजूरकर हिला जीव देण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
डॉ मनिषा जेजूरकर, डॉ नीलेश जेजूरकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचा प्रमुख डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर याला पत्नी डॉ. मनीषा हिला जीव देण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली असून, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत डॉ. नीलेशने जामिनासाठी केलेली धावपळ निष्फळ ठरली आहे.
बहिणीची तक्रार, पतीवर गुन्हा
६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा नीलेश जेजूरकर (वय ४०) यांनी गळफास घेत आयुष्याची अखेर केली होती. त्यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी पोलिसांत फिर्याद दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. नीलेशविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा गंगापूर पोलिसांत नोंद आहे. १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेदेखील नीलेशला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्यानुसार शुक्रवारी (दि. १८) दुपारी गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत कसून चौकशीला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू होती.
दरम्यान, घटनेनंतर बरेच दिवस नीलेश जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर गैरहजर होता. मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्यावर तो सेवेत रूजू झाला होता.
परीक्षेत चॅटजीपीटीचा वापर, IIT Bombay मधील सेकंड इयरच्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं, हॉस्टेलमध्येच दुर्दैवी अखेर
पाच वर्षांपासून दुर्लक्ष, त्रयस्थ डॉक्टर महिलेचा सल्ला
सन २०२१ पासून नीलेश हा पत्नी मनीषा यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होता. घरातील किरकोळ गोष्टींसह निर्णयाबाबत तो एका त्रयस्थ डॉक्टर महिलेचा सल्ला घेत होता. तिच्या सांगण्यांनुसार वागत असल्याने कौटुंबिक विसंवाद वाढला होता. नीलेशने पत्नीकडे दुर्लक्ष करून मानसिक त्रास दिला. सततचा मानसिक छळ आणि घरातील कलहामुळे मनीषा यांनी जीव दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Australia Car Crash : प्रेम आणि मायेला एकाच क्षणी मुकलो; ऑस्ट्रेलियात भारतीय सासू-सुनेचा अपघाती मृत्यू, मुलगा सुन्न, बाळाच्या पहिल्या बर्थडेनंतर आक्रित
‘तुझ्या बुद्धीची पातळी कमी’
दरम्यान, ‘जानेवारी २०२६ मध्ये नीलेशच्या डॉक्टर मैत्रिणीने त्याच्या पत्नीला फोन करून ‘तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस, तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे’, या शब्दांत हिणवून मानसिक त्रास दिला होता. घटनेच्या ठिकाणच्या फोटोनुसार, खिडकीला दोरी बांधलेली आढळली आहे. त्यामुळे अशा प्रकारे आत्महत्या होणे अशक्य वाटते. बॉडीचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात झाले. तेथे नीलेश कार्यरत असून ‘पोस्ट-मॉर्टम’ अहवालात फेरफार झाल्याचा आणि ही जीव दिल्याचा नसून जीव घेतल्याचा संशय आहे’, असा युक्तिवाद सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा