• Fri. Sep 18th, 2026

Mumbai Crime News : मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वडाळा पश्चिमेकडील बाळकृष्ण सुळे मार्गावर असलेल्या एका बांधकाम साईटवर ही धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबई वडाळा लिफ्ट अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईतील वडाळा पश्चिमेकडील बाळकृष्ण सुळे मार्गावर असलेल्या एका बांधकाम साईटवर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीमधील लिफ्टच्या डक्टमध्ये तोल जाऊन पडल्यानं संजय लिंबुनस मिंज (वय 37) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. 10 सप्टेंबर रोजी पहाटे 1 ते 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमारतीच्या सहाव्या मजल्यावर झोपण्यासाठी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय मिंज हे मुळात त्या बांधकाम साईटवर कामगार नव्हते. ते त्यांच्या दोन मित्रांसह तेथे काम करणाऱ्या आपल्या भाच्याला भेटण्यासाठी आले होते. 10 सप्टेंबरच्या रात्री हे चौघेही एकत्र जेवले आणि त्यानंतर त्याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. मात्र, पहाटेच्या सुमारास संजय मिंज यांचा अचानक तोल गेला आणि ते सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसलेल्या लिफ्टच्या डक्टमध्ये थेट खाली कोसळले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesMaharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांनो पावसाची आशा सोडा! महाराष्ट्राची चिंता वाढली, हवामान विभागाचं परतीच्या मान्सूननबाबत महत्त्वाचं अपडेट

बांधकाम साईटवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना नाहीत

घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी दिलेल्या माहितीनुसार आणि एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, संबंधित कंत्राटदाराने कामगारांसाठी सुरक्षित लेबर कॅम्प उभारला नव्हता. तसेच बांधकाम साईटवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. अत्यंत धोकेदायक परिस्थितीत कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याचं स्पष्ट झाल्यानंतर माटुंगा पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 106 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास माटुंगा पोलीस करत आहेत.

मुंबईकर दाम्पत्याला उडवलं

“मुलांना बिघडवणाऱ्या आणि समाजासाठी धोका निर्माण करणाऱ्या कृतींवर आळा घालणे आवश्यक आहे” असे निरीक्षण नोंदवत, ५ फेब्रुवारी रोजी आपल्या वडिलांची कार भरधाव वेगाने चालवून एका स्कूटरला धडक देत एकाचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. या अपघातात दुचाकीस्वार व्यावसायिक ध्रुमिल पटेल यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी कायमच्या दिव्यांग झाल्या आहेत.

Maharashtra TimesNagpur Accident : महिला कार चालकाने चिरडलं, बँक कर्मचाऱ्याला शोकाकुल वातावरणात निरोप, दोन वर्षांचा लेकही जखमी

सत्र न्यायालयाने तो आदेश रद्द केला

मुंबईतील विद्याविहार येथे झालेल्या या अपघाताप्रकरणी पोलिसांनी त्या चालकाला (जो त्यावेळी १७ वर्षे ८ महिन्यांचा होता) अटक केली होती. ६ मार्च रोजी ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डच्या दंडाधिकाऱ्यांनी त्याला जामीन मंजूर केला होता, परंतु सत्र न्यायालयाने तो आदेश रद्द केला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा