• Fri. Sep 4th, 2026

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 4, 2026

सातारा दि. ४: जिल्ह्यात प्रादेशिक पर्यटन अराखड्यातील कामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या आराखड्यातील कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील सुरु असलेल्या कामांचा पालकमंत्री देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवन संरक्षक अमोल सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत. ही कामे पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्यात स्थानिकांना रोजगाच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच पर्यटकांची संख्या ही वाढणार आहे. आराखड्यातील कामे वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने करून ही कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण करावीत. जल पर्यटन कामेही तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी केल्या.
००००

परस्पर विश्वासाच्या सामर्थ्यावर भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल – बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर – महासंवाद
Vidyanand Bapat : बापट कुटुंबात संस्कृत पठणाची परंपरा, विद्यानंद पूर्वी नास्तिक नव्हता, परिस्थितीने बदलला; आई-वडिलांनी आठवणी सांगितल्या
केरा-मणदुरे आणि तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथम स्थानिक शेतकऱ्यांना द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed