• Wed. Sep 2nd, 2026

नेपाळ दुर्घटनेतील बेपत्ता मृत पर्यटक नागरिकांची ओळख पटविण्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक येथे डीएनए नमुना संकलन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 2, 2026

मुंबई, दि. २: नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांच्या ओळख पटविण्याच्या प्रक्रियेसाठी डीएनए प्रोफायलिंग करण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील संबंधित मृतांच्या नातेवाईकांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संबंधित न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (Forensic Science Laboratory) प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

डीएनए नमुना देण्यासाठी येताना नातेवाईकांनी ३ पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि आधारकार्ड किंवा पॅनकार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीच्या किमान दोन जवळच्या नातेवाईकांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. यामध्ये वडील, आई, मुलगा किंवा मुलगी यांचा समावेश आहे.

नातेवाईकांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे आणि नाशिक येथे डीएनए नमुना संकलन व संबंधित प्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईतील नागरिकांसाठी :

संचालनालय, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (Directorate of Forensic Science Laboratories) हंस भु्ग्रा मार्ग, कालिना, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-९८.

संपर्क : श्रीमती जे. एम. वाणी, सहाय्यक संचालक – ८४८४९९२६८८

– एस. जी. पालस्कर – ९५९४९६१९८३

– श्रीमती के. डी. महाजन – ९५९४७४१६०५

  ई-मेल : [email protected]

  दूरध्वनी : ०२२-२६६७०७५५

पुण्यातील नागरिकांसाठी

प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (Regional Forensic Science Laboratory), पुणे

गणेशखिंड, चतुःशृंगी पोलीस ठाण्याशेजारी, पुणे.

संपर्क :  डी. सी. जोशी, उपसंचालक – ९५०३०५९९५९

– सी. यू. चव्हाण, सहाय्यक संचालक – ९७६७०२५०३१

  ई-मेल : [email protected]

नाशिकमधील नागरिकांसाठी

प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (Regional Forensic Science Laboratory), नाशिक

विद्युतनगरसमोर, दिंडोरी रोड, लोक सहकारनगर, नाशिक.

संपर्क :– आर. आर. पवार, उपसंचालक – ९४०५१८३२५३

– डॉ. आर. एम. पाटील, सहाय्यक संचालक – ८२७५२५७३१७

  ई-मेल : [email protected]

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची ओळख पटविणे आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने डीएनए प्रोफायलिंग अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे संबंधित नातेवाईकांनी निर्धारित वेळेत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

किरण वाघ/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed