• Sat. Aug 29th, 2026

Jalgaon News : सकाळी बहिणीने राखी बांधली, संध्याकाळी ‘हॅपी रक्षाबंधन ताई’ मोबाईलवर स्टेटस, भावाने स्वत:ला संपवलं; हॉस्पिटलमध्ये बहिणीचा हंबरडा

सण उत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाची पर्वणी, पण याच सणाच्या दिवशी एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. रक्षाबंधनानिमित्त सकाळीच बहिणीने मोठ्या प्रेमाने भावाच्या हातावर राखी बांधली, त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली. भावानेही बहिणीचं औक्षण करून तिला नेहमी सोबत राहण्याचं वचन दिलं. मात्र, हा आनंद काही तासांपेक्षा जास्त टिकू शकला नाही. संध्याकाळच्या सुमारास याच भावाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed