Dr Milind Chitley Missing : डॉ. चितळेंचा ग्रुप अचानक निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या वेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावरच होता, असे चितळे यांच्या हिल्स अँड ट्रेल्स तसेच हे पर्यटक ज्यांच्या सहकार्याने प्रवास करत होते त्या काठमांडूच्या रिचा ट्रेक्सने स्पष्ट केले आहे. घटनास्थळावरील पाहणी, हेलिकॉप्टरद्वारे केलेली हवाई पाहणी आणि तेथील व्हिडिओ फुटेज यावरून रसुवागढी येथे त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांवर झालेल्या परिणामाची व्याप्ती अत्यंत चिंताजनक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी मुंबईतील डॉ. मिलिंद चितळे यांच्यासोबत गेलेल्या पर्यटकांसह ६० जणांचा ठावठिकाणा गेल्या ४८ तासांपासून सापडत नसल्याचे नातेवाईक सांगत आहेत. हा गट अचानक निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या वेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावरच होता, असे चितळे यांच्या हिल्स अँड ट्रेल्स तसेच हे पर्यटक ज्यांच्या सहकार्याने प्रवास करत होते त्या काठमांडूच्या रिचा ट्रेक्सने स्पष्ट केले आहे. घटनास्थळावरील पाहणी, हेलिकॉप्टरद्वारे केलेली हवाई पाहणी आणि तेथील व्हिडिओ फुटेज यावरून रसुवागढी तिथे त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांवर झालेल्या परिणामाची व्याप्ती अत्यंत चिंताजनक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
महापुरावेळी चितळे रसुवागढीत
शुक्रवारी सकाळी, ‘नेपाळ माउंटेनियरिंग असोसिएशन’चे बचाव पथक नेपाळ-तिबेट (चीन) सीमेवरील त्या आपत्तीग्रस्त ठिकाणी पोहोचले. हा पूर आला तेव्हा रसुवागढी इमिग्रेशन केंद्रावर एकूण ६४४ व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये ५१७ परदेशी नागरिक, ज्यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे, आणि १२७ नेपाळी नागरिकांचा समावेश होता. डॉ. मिलिंद चितळे यांचा गट याच इमिग्रेशन केंद्रावर उपस्थित होता. बचाव पथकाच्या पाहणीतील माहितीनुसार कस्टम्स आणि इमिग्रेशन केंद्रावर असलेल्या यात्रेकरुंना पुराचा गंभीर फटका बसला आहे असे निवेदनात म्हटले आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.
Sanjana Agarwal : खूप गिल्टी वाटतंय, रक्षाबंधनाला केतनच्या आठवणीत संजनाला अश्रू अनावर, सियाला मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंटचं कारण सांगितलं
कुणालाही सुरक्षित बाहेर काढलेलं नाही
या इमिग्रेशन केंद्रावरून कोणत्याही नेपाळी कर्मचाऱ्याचा शोध लागलेला नाही किंवा त्यांना सुरक्षित बाहेर काढता आलेले नाही. चीनचे बचाव पथक, नेपाळ लष्कर, नेपाळ पोलीस आणि नेपाळ माउंटेनियरिंग असोसिएशन आपत्तीग्रस्त ठिकाणी शोध आणि बचाव कार्य करत आहेत. त्याच वेळी, आपत्तीग्रस्त ठिकाणापर्यंत पोहोचणे कठीण झाले असून त्या भागात केवळ बचाव पथकांनाच जाण्याची परवानगी आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या नेपाळ-तिबेट/चीन सीमेवरील आपत्तीग्रस्त ठिकाणाहून कोणालाही वाचवण्यात किंवा सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेले नाही, असे शुक्रवारी संध्याकाळी हिल्स अँड ट्रेल्सचे प्रा. चारुहास जोशी आणि रिचा ट्रेक्सचे सांगे गुरांग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Shiv Sena vs BJP : शिवसेनेकडील खात्यांमध्ये CMO ची ढवळाढवळ, मंत्र्यांची शिंदेंकडे जाहीर नाराजी, रिक्षाचालकांच्या मराठीला मुदतवाढ मिळताच कडेलोट मुंबईतील अंधेरीचे रहिवासी असलेले डॉ. मिलिंद चितळे हे व्यावसायिक डॉक्टर आहेत. तसेच ते अव्वल गिर्यारोहकही आहेत. त्यांना हिमालयातील मोहिमांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी कांचनजुंगा सर केले असून त्यांना गिर्यारोहणातील कामगिरीसाठी गिरिमित्र पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. काश्मीरपासून नेपाळपर्यंत अनेक सहलींचे आयोजन करण्यातही त्यांचा हातखंडा आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा