• Sat. Aug 29th, 2026

Chandrashekhar Bawankule: आदिवासींवरुन काँग्रेसचे राजकारण, राहुल गांधींना राज्यात ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न; बावनकुळेंचा आरोप

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करून काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातील ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांचा राजकीय हेतूसाठी वापर करणे योग्य नसून काँग्रेसने हा प्रकार तातडीने थांबवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा केली असून, त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच मागण्यांबाबत सरकारने लिखित आश्वासनही दिले आहे. त्यामुळे प्रश्न सुटण्याच्या दिशेने असताना आंदोलन सुरू ठेवण्याचा आग्रह कशासाठी, असा सवाल बावनकुळे यांनी केला.

Tribal student protest | आदिवासी विद्यार्थी संतप्त, अशोक उईकेंना राजीनाम्याची राखी दाखवत थेट मागणी

राज्य सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास तयार असून, गरज भासल्यास पुन्हा-पुन्हा चर्चा करण्याची सरकारची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यास सरकार कटिबद्ध आहे. मात्र, प्रश्न सुटण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू असतानाही आंदोलन सुरू ठेवले जात असल्याने त्यामागे राजकीय हेतू असल्याचे दिसून येते, असे बावनकुळे म्हणाले.

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका’

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय आंदोलन करण्याचा हा प्रकार त्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखा आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न हे राजकारणासाठी वापरण्याचे साधन होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि संधी वाढविण्यासाठी संवेदनशीलतेने काम करीत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र, काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचविण्याची अधिक चिंता असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.

Maharashtra TimesNagpur Crime : बारमध्ये मित्रांसोबत दारु प्यायला बसलेला, पत्नीचा फोन येताच बाहेर आला अन् तिथेच घात झाला; कुख्यात गुंडाला प्लॅन करुन संपवलंसरकारशी संवाद साधण्याचे आवाहन

आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत काँग्रेसला खरोखरच आस्था असेल, तर विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. ‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. राहुल गांधी यांच्या राजकीय पुनरागमनासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर करणे महाराष्ट्र कदापि स्वीकारणार नाही,’ असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा