Pune Metro: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजीनगर येथील भाऊसाहेब खड्डे चौक परिसरात पादचाऱ्यांना धावत्या वाहतुकीतून रस्ता ओलांडावा लागत आहे.झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.पादचाऱ्यांना पुरेशी रस्ता ओलांडायला जागा नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
मेट्रो मार्गिकेमुळे वाहतुकीत झालेला बदल
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण आणि महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सिमला चौक, सीओईपी; तसेच जिल्हा व सत्र न्यायालय परिसराची पाहणी केली. मेट्रो मार्गिकेमुळे वाहतुकीत झालेला बदल, पादचारी मार्ग, रस्ता ओलांडण्याच्या सुविधा आणि वाहतूक नियोजनाचा या वेळी आढावा घेण्यात आला.
वाहतूक सल्लागार समितीची बैठक
पोलिस आयुक्तालयात नुकतीच सर्वपक्षीय वाहतूक सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत वंदना चव्हाण यांनी पादचाऱ्यांची संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यात आली.
Mumbai News: सणासुदीच्या दिवसांतही नागरिकांना स्वच्छतेचे भान हवे ; मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केल्या सूचना
स्वतंत्रपणे रस्ता ओलांडण्याची सुविधा निर्माण केलेली नाही
मेट्रो मार्गिकेचे पिलर उभारल्यानंतर खुडे चौकात पादचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे रस्ता ओलांडण्याची सुविधा निर्माण केलेली नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सुरक्षित पादचारी मार्ग, रस्ता ओलांडण्यासाठी योग्य ठिकाणे आणि सिग्नलचे नियोजन करण्याबाबत पाहणी करण्यात आली.
Versova Bandra Coastal Road: वर्सोवा वांद्रे सागरी रस्त्याला विलंबाची किनार ; प्रकल्पाला १,४२१ दिवसांची मुदतवाढ
आवश्यक सुविधांचा स्वतंत्रपणे पुरेसा विचार झाला नाही
मेट्रो मार्गिकेचा आराखडा तयार केल्यानंतर तो महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. मंजुरीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होते. त्यामुळे मेट्रोचे पिलर उभारताना पादचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचा स्वतंत्रपणे पुरेसा विचार झाला नसल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. आता आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याची प्रत पोलिसांना देण्याची कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. पाहणीदरम्यान वाहनतळ व्यवस्था, सिग्नलचे नियोजन, पादचारी मार्ग आणि रस्त्यावरील अडथळ्यांचाही आढावा घेण्यात आला.
