• Fri. Aug 28th, 2026

BSNL Duct Accident: निगडीत डक्टमध्ये गुदमरुन 2 कामगारांचा करुण अंत; एकाच ठिकाणी वर्षभराने दुसरी घटना

BSNL Duct Accident: निगडीमधील ‘बीएसएनएल’च्या भूमिगत निरीक्षण डक्टमध्ये (चेंबर) अडकून बुधवारी रात्री दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच डक्टमध्ये गेल्या वर्षी फायबरचे काम करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा मृत्यू झाला होता.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: ‘बीएसएनएल’च्या भूमिगत निरीक्षण डक्टमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना निगडी प्राधिकरणात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. गेल्या वर्षी याच डक्टमध्ये उतरलेल्या तिघांचा मृत्यू झाला होता. हे कामगार आपले नसल्याचे ठेकेदार आणि बीएसएनएल या दोघांनीही म्हटल्यामुळे ते नक्की कोणाचे याचे गूढ वाढले आहे.

मनोज बाबूराव शिंदे (वय २६) आणि अमोल अशोक शिंदे (वय २०, दोघे रा. नाशिक जेलरोड, नाशिक, मूळ रा. सिद्धेश्वर, जि. हिंगोली) अशी मृतांची नावे आहेत. डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता, विषारी वायू किंवा अन्य कारणामुळे दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल. या डक्टमध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी फायबरचे काम करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

Maharashtra TimesNashik Crime : गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’मृत कामगार नक्की कोणाचे?

मध्यरात्री एकच्या दरम्यान पोलिस ईदचा बंदोबस्त संपवून पोलिस ठाण्याकडे निघाले असता लोकमान्य रुग्णालयाजवळ मुन्ना नावाच्या व्यक्तीने त्यांना अडविले. माझे दोन सहकारी डक्टमध्ये गेले होते. ते अजून बाहेर आले नाहीत, असे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावले. त्यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या कामगारांना येथे कामासाठी कोणी बोलावले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे कामगार ठेकेदाराचे नाहीत; तसेच ‘बीएसएनएल’चेही नाहीत. हे कामगार नेमके कोणाचे होते, त्यांना कोणी पाठविले होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Maharashtra TimesShilpa Gaware Case : रक्षाबंधनच्या आधीच बहिणीचा मृत्यू; इस्त्रीने चटके देत मारहाण केल्याचा आरोप, 17 वर्षे छळ सोसला, शिल्पाचा संशयास्पद मृत्यू, भावाचा दावाअपघाताची जबाबदारी निश्चित करा
या घटनेप्रकरणी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दुर्घटनेची स्वतंत्र फॉरेन्सिक चौकशी करून ‘बीएसएनएल’ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची – जबाबदारी निश्चित करावी, सुरक्षा ऑडिट करावे; तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी अॅड. सागर चरण यांनी केली आहे.

डक्टमध्ये दोन व्यक्ती पडल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. ते डक्टमध्ये नेमके कशासाठी उतरले होते आणि त्यांना काम कोणी दिले होते, याचा तपास सुरू आहे. – महेश बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निगडी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा