Pune MH 61 New Passing Number : पुण्यातील वाहनांना आता नवीन ओळख मिळणार आहे. एमएच ६१ला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. चारचाकीच्या पसंती क्रमांकासाठी एक हजारापेक्षा जास्त अर्ज आले आहेत.
नागरिकांना पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्याने अनेक क्रमांकांचे वाटप लिलाव पद्धतीने होणार असून, त्यामुळे ‘आरटीओ’ला मोठा महसूल मिळणार आहे. पसंती क्रमांकासाठी आलेले अर्ज पाहता नागरिकांनी ‘एमएच १२’ प्रमाणेच ‘एमएच ६१’लादेखील पसंती दिल्याचे दिसत आहे. पुणे ‘आरटीओ’ची ‘एमएच १२’ ही सीरीज नुकतीच संपली आहे. ‘एमएच १२’ ही पुणेकरांची ओळख असल्यामुळे तीच सिरीज मिळावी, अशी मागणी केली जात होती. त्यासाठी पुणे ‘आरटीओ’, लोकप्रतिनिधींनीदेखील प्रयत्न केले. पण, तांत्रिक अडचणीमुळे शक्य झाले नाही. त्यामुळे पुण्याला नवीन ‘एमएच ६१’ ही वाहन नोंदणी मालिका देण्यात आली. ‘आरटीओ’ने २७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘एमएच ६१ ए’ ही मालिका चारचाकीच्या पसंती क्रमांकासाठी खुली केली. नागरिकांना पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या मालिकेसाठी एक हजार १८ नागरिकांनी अर्ज केले आहेत. यावरून नवीन मालिकेलाही पूर्वीप्रमाणेच नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
Nagpur Crime : पतीचं निधन, पदरी दोन मुलं; लग्नाच्या आमिषाने 26 वर्षीय महिलेवर अत्याचार, महाराष्ट्रातील राज्यमंत्र्याच्या बॉडीगार्डवर गुन्हा
९१ या क्रमांकाला सर्वाधिक पसंती
‘एमएच ६१ ए’ मालिकेतील ९१ या क्रमांकाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे दिसत आहे. या क्रमांकासाठी नऊ जणांनी अर्ज केला आहे. त्याखालोखाल २४, २७, २४२४, ६१६१ आणि ९९०९ या पाच क्रमांकांसाठी प्रत्येकी आठ अर्ज आले आहेत. साधे आणि कमी अंकांचे क्रमांक; तसेच एकाच अंकाची किंवा अंकसमूहाची पुनरावृत्ती असलेल्या क्रमांकांना नागरिकांचा कल असल्याचे अर्जांवरून दिसते.
‘डबल’, ‘ट्रिपल’ आणि पुनरावृत्ती होणाऱ्या
विशेष म्हणजे, एक अंकी क्रमांकांसह ‘डबल’, ‘ट्रिपल’ आणि पुनरावृत्ती होणाऱ्या चार अंकी क्रमांकांची मागणी मोठी आहे. वैयक्तिक शुभांक, जन्मतारीख, व्यवसायाची ओळख अथवा सहज लक्षात राहणारा क्रमांक वाहनाला मिळावा, यासाठी नागरिक जादा शुल्क भरण्यासही तयार असल्याचे दिसून येते. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांमध्ये नियमानुसार लिलाव होणार आहे. ‘एमएच ६१ ए’ मालिकेला मिळालेला प्रतिसाद पुण्यातील आकर्षक वाहन क्रमांकांची वाढती क्रेझ अधोरेखित करणारा ठरला आहे. सध्या ‘एमएच ६१ बी’ ही दुचाकीसाठी मालिका सुरू असून, ही मालिका पसंती क्रमांकासाठी खुली केली आहे.
Eknath Shinde : शिवसेनेला मुंबईचं महापौरपद कधी? शिंदेंनी आतली बातमी सांगितली; म्हणाले, फडणवीसांशी पाचपैकी सव्वा वर्षाबाबत चर्चा
‘एमएच ६१’ ही नवी क्रमांक मालिका
‘एमएच १२’ ही वाहन नोंदणी मालिका संपल्यानंतर आता पुणे ‘आरटीओ’कडून ‘एमएच ६१’ ही नवी क्रमांक मालिका सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता चारचाकींसाठी चार अंकी वाहन क्रमांकाला वाहनधारकांकडून अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.
या क्रमांकासाठी सर्वाधिक अर्ज
‘एमएच ६१’ मालिकेच्या पसंतीच्या पहिल्या दहा क्रमांकांमध्ये ९१ क्रमांसाठी – नऊ अर्ज; २४ – आठ; २७ – आठ; २४२४ – आठ; ६१६१ – आठ; ९९०९ – आठ; ५ – सात; २३ – सहा; ५५५ – सहा आणि २४९८ क्रमांकासाठी – सहा अर्ज, असा क्रम आहे. याशिवाय सहा, १०, ५१५१, ६९९९, ७०७० आणि ९००१ या क्रमाकांसांठी प्रत्येकी पाच अर्ज दाखल झाले आहेत. १५००, १७९९, ३०००, ५००६, ५६६६, ६६६६, ७१११, ७१७१, ८११८ आणि ९००५ या क्रमांकांनाही अधिक वाहनधारकांनी पसंती दिली आहे.
