तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडून बापलेकाचा करुण मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घडली. मुलगा पाण्यात उतरल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी तलावात उडी घेतली; मात्र तलावातील गाळात दोघेही अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. अण्णा एकनाथ तलवारे (वय ३२) आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र ऊर्फ विरू अण्णा तलवारे (वय ७) अशी मृतांची नावे आहेत.
Shilpa Gaware : पुण्यात उच्चभ्रू कुटुंबांतील महिलेने स्वत:ला संपवलं, सासरच्यांवर हुंडा आणि छळाचे गंभीर आरोपविरू सकाळी तलावाजवळ खेळत होता. खेळता खेळता तो पाण्यात उतरला. ही बाब वडिलांच्या लक्षात येताच अण्णा तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावाकडे धाव घेतली. मात्र, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने दोघेही त्यात अडकले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. या निमित्ताने तलावातील गाळ आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अण्णा तलवारे व विरू मूळचे आर्वी (ता. जि. धुळे) येथील रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते सध्या अण्णा यांची सासरी खवशी येथे वास्तव्यास होते. या घटनेमुळे तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Solapur Crime : 42 वर्षीय विवाहितेचं 27 वर्षीय तरुणाशी इन्स्टावर सूत जमलं, मुलगा-नवऱ्याला सोडून आली, लग्नाचा तगादा, प्रियकराची दुर्दैवी अखेरतीन बहिणींचा आधार गेला
जळगाव : भुसावळ येथे वीजपुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करताना विजेचा धक्का लागून महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ वैभव पुरुषोत्तम दांडेकर (वय ३५) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. तापी नगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ते डीएस कॉम्प्लेक्सजवळील ११ केव्ही कट पॉइंटवरील फॉल्ट तपासत होते. त्या वेळी त्यांना तीव्र धक्का बसला. रक्षाबंधनापूर्वी तीन बहिणींचा एकुलता भाऊ हिरावल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
Nanded Crime: काका-पुतणीच्या नात्याला काळिमा! चॉकलेटचे आमिष दाखवून २ वर्षांच्या चिमुकलीवर काकाचा अत्याचारकार ओढ्यात कोसळून दोन ठार
भरधाव कार दुभाजकाला धडकून रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळून झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळील वाकसई गावच्या हद्दीत सुरज ढाब्यासमोर गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे सव्वाचारच्या दरम्यान ही घटना घडली. हुसेन शब्बीर गोधरावाला (वय २७, रा. कोंढवा) आणि आसीर असगरअली इनामदार (वय २६, रा. नेहरुनगर, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कारचालक अनिकेत गौतम बरवा असे जखमीचे नाव आहे.
