• Fri. Aug 28th, 2026

Ajay Salame : २६ वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झालं असून तिला दोन अपत्यं आहेत. दोन वर्षांपूर्वी आरोपी अजय सलामे याची पीडित महिलेशी ओळख झाली. विवाहित असतानाही त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : विवाहित असतानाही लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस अंमलदाराविरुद्ध रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सलामे (३८) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. अजय हा राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा अंगरक्षक आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अजय पसार आहे.

अजय यापूर्वी एका माजी खासदाराचाही अंगरक्षक होता. या घटनेने पोलिस विभागासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पतीनिधनानंतर पीडितेची आरोपीशी ओळख

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, २६ वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाले असून, तिला दोन अपत्ये आहेत. दोन वर्षांपूर्वी अजयची पीडित महिलेशी ओळख झाली. त्यानंतर अजय तिच्या सतत संपर्कात राहू लागला. विवाहित असतानाही त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

लग्नाची टाळाटाळ, फोटो व्हायरल करण्याची धमकी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महिला त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह करू लागली. मात्र, अजय लग्नास टाळाटाळ करू लागला. तीन दिवसांपूर्वी महिलेने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने तिचे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, पिस्तुलाचा धाकही दाखवला, असा आरोप महिलेने केला आहे.

Maharashtra TimesRajkumar Jaat : कपडे काढले, 51 किमी चालत राहिला, 23 वर्षीय UPSC उमेदवाराची बॉडी सापडली, कुटुंबीयांचे गंभीर आरोपपीडित महिलेने थेट पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोद्दार यांनी सलामे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बुधवारी रामटेक पोलिसांकडून अजय सलामे याच्याविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच अजय पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात एका महिलेची भूमिकाही संशयास्पद असल्याची माहिती आहे.

Maharashtra TimesCrime News : समलिंगी डेटिंग ॲपवर मैत्री, निर्जन जागी भेटायला बोलवायचे, कुणी नसल्याचं पाहून डाव साधायचे, दोघांना अटक

नितेश कराळे यांना ॲट्रॉसिटी प्रकरणात अटक

दुसरीकडे, सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे कार्यकर्ते नितेश कराळे यांना अटक केली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास अमरावती येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. कराळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करीत काहींनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे कराळे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अमरावतीतून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.