• Sun. Aug 16th, 2026

Nagpur News : दिवसभर कर्तव्य बजावलं, रात्री कुटुंबासह जेवण अन् रात्री अचानक टोकाचं पाऊल, पोलीस अधिकाऱ्याने असं का केलं?

नागपुरात एका पोलीस अधिकाऱ्याने स्वत:ला संपवून घेतल्याने खळबळ उडाली आहे. या पोलीस अधिकाऱ्याने स्वत:ला संपवलं? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर पोलिसांना कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : दिवसभराचे कर्तव्य बजावल्यानंतर घरी परतले, कुटुंबीयांसोबत जेवण केले आणि त्यानंतर काही वेळातच नागपूर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. पोलीस लाईन टाकळी येथील शासकीय पोलीस क्वार्टरमध्ये घडलेल्या या घटनेने पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर अंकुशराव झोल असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते नागपूर पोलीस आयुक्तालयातील अर्ज शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

कुटुंबियांसोबत जेवले, नंतर टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीचे कर्तव्य आटोपून ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केले. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असताना जेवणानंतर त्यांच्या पत्नी मुलांना झोपवण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या. काही वेळाने पत्नी मुलांना झोपवून बाहेर आल्यानंतर त्यांना झोल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने झोल यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला.

पोलिसांकडून तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्वार्टरची पाहणी करून आवश्यक पुरावे जमा करण्यास सुरुवात केली. प्राथमिक तपासात घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे झोल यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

पोलीस ठाण्याक आकस्मिक मृत्यूची नोंद

कामाचा ताण, वैयक्तिक कारण अथवा अन्य कोणत्या परिस्थितीमुळे ते मानसिक तणावात होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव जालना जिल्ह्यातील मूळ गावी रवाना करण्यात आले. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबईत नौदलाच्या जवानाने जीवन संपवलं

नागपुरात पोलीस अधिकाऱ्याने जीवन संपल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत देखील अशीच काहीशी घटना समोर आली आहे. मुंबईत नौदल अधिकाऱ्याने आपल्या कुटुंबासह जीवन संपवलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या कुलाबा येथे नेव्ही नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या नौदल अधिकाऱ्याने आधी आपल्या पत्नी आणि दोन लेकरांना जेवणातून विषबाधा केली. यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जात आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा