• Sat. Aug 15th, 2026

पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या कॅम्प परिसरातील बर्गर किंगवर एफडीने धाड टाकली. तसेच लोहगाव येथील झेप्टोच्या गोडाऊनवरही धाड टाकली. या दोन्ही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर एफडीएने दोघांचा परवाना थेट रद्द केला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बड्या कंपन्यांना आता चांगलाच चाप बसणार आहे. डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या धडक कार्यपद्धतीचा अवलंब करत अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात मोठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. ‘नाव मोठे पण लक्षण खोटे’ अशी अवस्था असलेल्या काही बड्या ब्रँड्सवर एफडीएने सर्जिकल स्ट्राईक केला असून, याचा दणका आता पुण्यातील प्रसिद्ध ‘बर्गर किंग’ आणि ‘झेप्टो’ कंपनीला बसला आहे.

पुण्यातील तरुणाई आणि खवय्यांची नेहमीच गर्दी असणाऱ्या कॅम्प भागातील ‘बर्गर किंग’वर प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. दररोज हजारो नागरिक चवीने जिथे बर्गर खातात, तिथेच अन्नसुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे उघडकीस आले आहे. एफडीएच्या पथकाने केलेल्या अचानक तपासणीत येथे अन्नाच्या दर्जात मोठी तडजोड होत असल्याचे समोर आले. तसेच, रेस्टॉरंटमधील अस्वच्छतेमुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. या गंभीर त्रुटी पाहता, मुंढे स्टाईलने कुठलीही दयामया न दाखवता या आउटलेटचा परवाना थेट रद्द करण्यात आला आहे.

नेमकी कारवाई काय केली?

अन्न आणि औषध (एफडीए) प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीए प्रशासनाकडून राज्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या हॉटेल आणि आस्थापनांवर छापेमारी केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये यासाठी विविध हॉटेल आणि आस्थापनांकडून अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे ना? याची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून केली जात आहे. एफडीएने पुण्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी सर्वात मोठ्या कारवाया केल्या आहेत. लाखो पुणेकर ज्या आस्थापनांवर डोळे बंद करुन विश्वास ठेवतात त्याच आस्थापनांवर एफडीएने धाड टाकली. यावेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर थेट परवाना रद्द करण्याची मोठी कारवाई तुकाराम मुंढे यांनी केली आहे.

पुण्यात बर्गर किंगचा परवाना थेट रद्द

पुण्यात एफडीएने मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या कॅम्प परिसरात एफडीएने बर्गर किंगवर छापा टाकला. यावेळी खाद्य पदार्थासंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रसिद्ध बर्गर किंगवर मोठी कारवाई केली आहे. एफडीएने या बर्गर किंगचा थेट अन्न सुरक्षा परवाना रद्द केला आहे.

बर्गर किंगवर पुणेकरांचा मोठा विश्वास होता. इथे दररोज हजारो पुणेकर बर्गर खाण्यासाठी येतात. या बर्गर किंगवर पुणेकरांची नेहमी रेलचेल असायची. पण आता एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या बर्गर किंगवर छापा टाकल्यानंतर खाद्य पदार्थांबाबत गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या बर्गर किंगचा थेट परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय एफडीएने घेतला आहे.

पुण्यात Zepto कंपनीच्या गोडाऊनवर धाड

एफडीएने केवळ बर्गर किंगवर कारवाई केली नाही तर पुण्यातील लोहगाव येथील zepto कंपनीच्या गोडाऊनवर देखील धाड टाकली. यावेळी एफडीएने थेट परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. रिफ्रेजेरेटर आणि प्रोझन केलेल्या पदार्थात अनेक त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

‘दहा मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा करत सामान पोहोचवणाऱ्या ‘झेप्टो’ कंपनीलाही या कारवाईचा मोठा फटका बसला आहे. लोहगाव येथील झेप्टोच्या गोदामावर अचानक टाकलेल्या छाप्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आले.

या गोदामात पुढील गंभीर त्रुटी आढळल्या :

फ्रोझन आणि थंडगार पदार्थांसाठी आवश्यक असणारे तापमान न राखणे. एक्सपायरी डेट संपलेले अन्नपदार्थ बिनधास्त साठवून ठेवणे. तसेच साठवणूक व्यवस्थेतील कमालीची अस्वच्छता आणि कीटक नियंत्रणाचा पूर्णपणे अभाव. असल्याच या धाडीत निदर्शनास आले आहे. ​या अनागोंदी कारभारामुळे अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ पावले उचलत पुण्यातील झेप्टो कंपनीचा परवाना रद्द करण्याची धडक कारवाई केली आहे.