अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना मिळवून देण्यासाठी काही जणांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचं एफडीएच्या निदर्शनास आलं आहे. अशा लोकांना पैसे न देता ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन एफडीएने केलं आहे. तसेच अशाप्रकारे पैशांची मागणी करणाऱ्यांची एफडीएला ई-मेलद्वारे तक्रार करण्याचं आवाहनदेखील एफडीएकडून करण्यात आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : काही व्यक्ती किंवा आस्थापना स्वतःला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकृत एजंट असल्याचे भासवून तसेच प्रशासनातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून अन्न व औषध विषयी परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली अर्जदारांकडून पैशांची मागणी करीत आहेत. अशा प्रकारच्या गैरप्रकारांपासून नागरिकांनी, परवानेधारकांनी आणि आस्थापनांनी सावध राहावे, असे आवाहन राज्याच्या अन्न व औषध प्रशासनच्या वतीने करण्यात आले आहे.
एफडीएने काय म्हटलं आहे?
महाराष्ट्रातील सर्व नागरिक, औषध उत्पादक, घाऊक व किरकोळ औषध विक्रेते, Food Business Operators तसेच अन्न व औषध विषयी परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या संबंधितांना याद्वारे सूचित करण्यात येते की, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी अन्न व औषध विषयी परवाना मिळविणे, परवान्याच्या अर्जाची प्रक्रिया करणे किंवा त्यासंदर्भातील कोणतेही काम करण्यासाठी कोणत्याही एजंट, मध्यस्थ अथवा त्रयस्थ व्यक्ती/संस्थांची अधिकृत नियुक्ती केलेली नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अन्न व औषध विषयी परवान्यासाठी अर्ज करणे तसेच परवाना मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही एजंट अथवा त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातून अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्जदार स्वतः अधिकृत पोर्टलवर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अन्न व औषध विषयी परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा?
अन्न व औषध विषयी परवान्यासाठी अर्ज करण्याकरिता FDA महाराष्ट्राचे अधिकृत पोर्टल fdamfg.maharashtra.gov.in व foscos.fssai.gov.in असून त्यावर अर्ज प्रक्रिया व आवश्यक मार्गदर्शक सूचना (Guidelines) उपलब्ध आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अथवा त्यांचे नावाने कोणीही अर्जावरील कार्यवाही घेण्यास आर्थिक मागणी करत असल्यास आयुक्तालयाच्या ईमेल वर तक्रार नोंदवावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. नागरिकांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना बळी न पडता, औषध परवान्यासाठी केवळ FDA महाराष्ट्राच्या अधिकृत ऑनलाईन प्रणालीचा वापर करावा.
अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शक सूचना (Drug License Guidelines) : fdamfg.maharashtra.gov.in/DOCS/FDA%20Maharashtra%20Guidelines.pdf
अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शक सूचना (Food License Guidelines): foscos.fssai.gov.in/assets/docs/fbo/HowtoapplyforLicense_registrationcerti ficate.pdf
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
“अन्न व औषध विषयी परवाने मिळविण्यासाठी कोणत्याही एजंट अथवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. FDA महाराष्ट्राने यासाठी कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केलेली नाही. परवान्यासाठी अर्ज करण्यास प्रशासनाच्या अधिकृत ऑनलाइन प्रणालीचा अर्जदाराने स्वतः वापर करावा. कोणत्याही त्रयस्थ व्यक्ति किंवा संस्था यांचेद्वारे प्रशासनाच्या अधिकारी यांचे नावे आर्थिक मागणी केल्यास त्याची तक्रार तत्काळ प्रशासनाकडे करावी”, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा