• Thu. Aug 13th, 2026

    ‘हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त महाराष्ट्र सदन परिसरात तिरंगा रॅली – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 13, 2026

    नवी दिल्ली, दि. १३ : येथील महाराष्ट्र सदनात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने महाराष्ट्र सदन परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली.

    महाराष्ट्र सदनच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते या रॅलीला प्रारंभ झाला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे,  सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    अभियानाच्या शुभारंभानंतर महाराष्ट्र सदन परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत अधिकारी-कर्मचाऱ्यांसह उपस्थित नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश दिला. यावेळी राष्ट्रभक्तीचा अविष्कार दर्शविणाऱ्या घोषणांनी महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमला होता.

    ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून उत्साहात देशाचा  स्वातंत्र्यदिन साजरा करावा, तसेच राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि अभिमानाची भावना अधिक दृढ करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
    0000

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed