Mumbai Metro 2 B : डायमंड गार्डन ते चेंबूर मेट्रो मार्गिका २ बीच्या विस्तारासह पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट बीकेसीला जोडणारा १.४ किलोमीटरचा शीव-चेंबूर लिंक रोड (SCLR) हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे.
मेट्रो २ बी मार्गिका चेंबूरपर्यंत खुली
डी. एन. नगर ते मंडाळे ही मेट्रो २ बी मार्गिका चेंबूरपर्यंत खुली होणार आहे. चेंबूर मेट्रो स्थानक हे व्ही. एन. पुरव मार्गावरील मोनो रेल स्थानकापासून १०० मीटर अंतरावर आहे. चेंबूर मोनो रेल स्थानकापासून चेंबूर रेल्वे स्थानक २०० मीटर अंतरावर आहे. यामुळे चेंबूरपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोनो, मेट्रो आणि हार्बर लोकल असे तिन्ही वाहतुकीचे पर्याय प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत. चेंबूरसह पूर्व उपनगरांतील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो २ बीचा डायमंड गार्डन ते मानखुर्द हा टप्पा ८ एप्रिलपासून खुला झाला होता.
कलानगरमार्गे वळसा टळणार
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडच्या (एससीएलआर) शेवटच्या १.४ किमी लांबीच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात ५०० मीटर लांबीचा चारपदरी उन्नत मार्ग, तसेच ९०० मीटर लांबीचे दोनपदरी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे उड्डाणपूल मार्ग आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाली असून सध्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला जंक्शनपासून थेट भारतनगर, वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत पोहोचण्यासाठी हा अंतिम टप्पा महत्त्वाचा आहे. हा मार्ग खुला झाल्यावर कलानगरमार्गे वळसा टळणार आहे. बॅ. बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल असे या बीकेसी कनेक्टरचे नामकरण करण्यात आले आहे.
Ghatkopar Landslide : वाढदिवसाची पार्टी अंत्ययात्रेत बदलली, भावंडांनी गिफ्ट्स आणली, आईची औक्षणाची तयारी, क्षणभर घराबाहेर पडलेल्या मुंबईकर तरुणाचा दुःखद अंत
पुण्यातील गंगाधाम उड्डाणपुलाची दिशा ठरली
दुसरीकडे, अत्यंत वर्दळीच्या आणि तीव्र उतारामुळे अपघातांचे केंद्र ठरलेल्या पुण्यातील मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाची दिशा अखेर निश्चित झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे पुलाची दिशा ठरत नव्हती. अखेर आता मार्केटयार्ड पीएमपी डेपोकडून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल करण्याचा, तर झाला कॉम्प्लेक्सपासून बिबवेवाडी कोंढवा रस्त्याला जोडरस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गंगाधाम चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने गंगाधाम चौकामध्ये उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारायचा निर्णय घेतला होता. २०१८मध्ये क्रेडिट नोटच्या बदल्यात पीपीपी तत्त्वावर हे काम करण्याची निविदाही मंजूर झाली. परंतु, हा उड्डाणपूल बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर उभारायचा की मार्केट यार्डकडून सरळ टेकडीवरून बिबवेवाला जाणाऱ्या रस्त्यावर उभारायचा यावरून लोकप्रतिनिधींमध्ये एकमत होत नव्हते. परिणामी हा प्रकल्प दीर्घ काळ रखडला.
उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्ग
दरम्यान, वाहतूक पोलिसांनीही येथील वाहतुकीचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजनांसंदर्भात पालिकेकडे अहवाल दिला होता. प्रशासनाने शहरात उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्ग अर्थात ‘एचसीएमटीआर’चे काम निश्चित केल्यानंतर आता या उड्डाणपुलाची दिशादेखील अंतिम केली आहे.
Vile Parle Fire : मरण डोळ्यासमोर तरी कर्तव्य विसरली नाही, फ्लॅटला आग, घरकाम करणाऱ्या अंकिताची चिमुकल्या अबीरसाठी धाव, दोघांचाही वेदनादायी अंत‘गंगाधाम चौकातील डोंगरउतारावरून दोन नाले मार्केट यार्डच्या दिशेने येत असल्याने भुयारी मार्गाचा प्रस्ताव रद्द केला आहे. बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावरून एचसीएमटीआर मार्गिकेची अलाइनमेंट असल्याने मार्केट यार्ड येथील पीएमपी डेपोसमोरून थेट बिबवेवाडी कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचे निश्चित करण्यात आला आहे,’ असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.
