• Fri. Jul 31st, 2026
    Nagpur News : कामासाठी बाहेर निघाले, दोन्ही लेक गेल्याची बातमी आई-बापाच्या कानावर; रेल्वेच्या धडकेत सख्ख्या भावांचा हृदयद्रावक अंत

    Nagpur News : घराबाहेर पडलेल्या दोन भावांचा रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. ही घटना घातपात आहे की आत्महत्या आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

    नागपूर सावनेर रेल्वे स्टेशन भावांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी घडलेल्या एका हृदयद्रावक रेल्वे अपघातात सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे रुळाजवळ असताना भरधाव रेल्वेची धडक बसल्यानं हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे सावनेर शहरासह परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सावनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

    कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    मृतकांची ओळख निरंजन लक्ष्मण फिरके (वय 40) आणि योगेश लक्ष्मण फिरके (वय 37, रा. सावनेर) अशी झाली आहे. दोघेही सख्खे भाऊ असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास सावनेर परिसरातील रेल्वे मार्गावर दोनजण रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना अंकित हांडे यांनी दिली. त्यानंतर बनसोड यांनी तातडीने सावनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
    Maharashtra TimesST Bus Accident: पुण्याकडून निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, बसचा चक्काचूर
    दरम्यान, हितज्योती आधार फाउंडेशनचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत दोन्ही भावांना रेल्वे रुळावरून बाहेर काढून सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केलं. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही भाऊ रेल्वे रुळाजवळ असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेची धडक त्यांना बसली. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला, ते रेल्वे रुळ ओलांडत होते की अन्य काही कारणामुळे ही दुर्घटना घडली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून सर्व शक्यतांचा तपास केला जात असून रेल्वे प्रशासनाकडूनही आवश्यक माहिती संकलित करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesRain News: धक्कादायक! मुसळधार पावसात आर्टिगा कार गेली वाहून; फक्त बाप वाचला, शिक्षिकेसह दोन मुली बेपत्ता

    अपघाताचे नेमके कारण काय?

    या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. रेल्वे रुळ ओलांडताना किंवा रेल्वे मार्गाजवळ वावरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा