• Mon. Jul 27th, 2026
    साथ सोडली, नाराजी मांडली, तरी म्हणतात हॅपी बर्थडे टू यू! ठाकरेंना सोडणाऱ्या संजय जाधवांच्या शुभेच्छांनी आश्चर्य

    Sanjay Jadhav Uddhav Thackeray Birthday Wishes : ‘उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या सदिच्छा’ अशी फेसबुक पोस्ट खासदार संजय जाधव यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    परभणी : शिवसेनेतील पहिल्या फुटीवेळी उद्धव ठाकरे ंसोबत एकनिष्ठ राहिलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी उबाठाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मात्र आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय जाधव यांनी सोशल मीडियावरुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे नेमकं खासदार संजय जाधव यांच्या मनात चाललंय तरी काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. ‘मा. उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, या सदिच्छा’ अशी फेसबुक पोस्ट जाधवांनी केली आहे.

    कट्टर शिवसैनिक, ठाकरेंशी राहिलेले एकनिष्ठ

    खासदार संजय जाधव हे मुळात कडवट शिवसैनिक आहेत. आतापर्यंत त्यांनी कधीच ठाकरे परिवाराशी गद्दारी केली नाही. सामान्य शिवसैनिकापासून ते आमदार आणि आता तिसऱ्यांदा खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आतापर्यंत आलेल्या शिवसेनेच्या प्रत्येक संकटात खासदार संजय जाधव यांना ठाकरे यांची साथ कधीच सोडली नव्हती. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर सबंध राज्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असताना देखील खासदार संजय जाधव मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम राहिले होते.

    ऑपरेशन टायगर वगैरे फेल असल्याच्या बाताही खासदार संजय जाधव यांनी केल्या होत्या. त्यामुळे सर्वांनाच असे वाटत होते की आता खासदार संजय जाधव कधीच ठाकरेंना सोडणार नाही. लोकसभेच्या प्रचारादरम्यान खासदार संजय जाधव यांनी मरेपर्यंत ठाकरे परिवारांशी बेमानी करणार नसल्याची शपथ देखील घेतली होती.
    Maharashtra TimesNandan Nilekani : ‘आधार’च्या शिल्पकाराचा मोदींना आधार; कोण आहेत नंदन नीलेकणी? भारताच्या डिजिटल क्रांतीत मोलाचा वाटा

    पक्षश्रेष्ठींवर नाराजी, निधीचं कारण

    काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फार मोठी फूट पडली. ठाकरेंचे तब्बल सहा खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले. या खासदारांमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचा देखील समावेश आहे. पक्ष सोडताना त्यांनी पक्षश्रेष्ठीकडून बळ मिळत नसल्याची तक्रार देखील केली होती. त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे दौरे करत नसल्याचे देखील त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले होते. विरोधात राहिल्यानंतर कसल्याही प्रकारचा विकास निधी मिळत नाही आणि परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण ठाकरे यांची साथ सोडत असल्याचे खासदार संजय जाधव यांनी जाहीर केले होते.

    ठाकरेंचा दौरा, जाधवांचा समाचार

    संजय जाधव यांनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी परभणी जिल्हा दौरा केला होता. या दौऱ्या दरम्यान खासदार संजय जाधव यांच्यावर राऊतांनी कडाडून टीका केली होती. पत्र्याच्या घरात राहणारे संजय जाधव आज दोन हजार कोटीचे मालक कसे झाले? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. शिवसेनेने एवढे दिलेले असताना देखील उद्धव ठाकरेंची साथ का सोडली असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता, त्यानंतर मात्र खासदार संजय जाधव आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कमालीचा संघर्ष असल्याचा अंदाज सर्वत्र वर्तवला जात होता. मुळामध्ये परभणी जिल्हा शिवसेना आणि ठाकरे परिवारांचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यांमध्ये गद्दारांना कसल्याही प्रकारची जागा नसल्याचे आत्तापर्यंत परभणीकरांनी दाखवून दिले आहे.

    Gunratan Sadavarte On Thackeray Brothers | ‘ठाकरेंना बो&^%$ घालायची सवय’, सदावर्तेंचा हल्लाबोल

    ठाकरेंच्या वाढदिवशी शुभेच्छा

    उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कसल्याही प्रकारचे वक्तव्य करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर त्यांच्यावर झालेल्या टिकेला देखील त्यांनी कसल्याही प्रकारचे उत्तर देखील दिलं नव्हतं. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मात्र खासदार संजय जाधव यांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय जाधव यांनी सोशल मीडियातून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे खासदार संजय जाधव यांच्या मनात चालले तरी काय आहे असा प्रश्न मात्र परभणी जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.

    गद्दारीचा फटका बसण्याची भीती

    उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेले प्रचंड सहानुभूती हीच खासदार संजय जाधव यांना अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंसोबत खासदार संजय जाधव यांनी केलेली गद्दारी परभणी जिल्ह्यातील नागरिकांच्या पत्नी पडलेली नाही आणि त्यामुळेच कुठेतरी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, यासाठीच खासदार संजय जाधव उद्धव ठाकरे यांना चुचकारत असल्याचे दिसून येत आहे. पण त्यांनी दिलेल्या या शुभेच्छांमुळे मात्र जिल्हाभरामध्ये जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
    Maharashtra TimesArchita Rahar : प्रधानांचा राजीनामा, भाजप खासदाराच्या कन्येची आनंदात इन्स्टा पोस्ट, डिलीट करण्याची सूचना मिळताच म्हणाली, आता आईला फोन करतील
    उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष यावर काय प्रतिक्रिया देईल हे मात्र येणाऱ्या काळात पहावे लागणार आहे.