Mumbai Jogeshwari Srushti Jain Death Case : जोगेश्वरी पूर्व येथील हायप्रोफाईल ‘ओबेरॉय स्प्लेंडर’ सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडल्याने झालेल्या 33 वर्षीय सृष्टी जैन यांच्या मृत्यू प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा झाला आहे.
मुंबई सृष्टी जैन मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील हायप्रोफाईल ‘ओबेरॉय स्प्लेंडर’ सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडल्यानं झालेल्या 33 वर्षीय सृष्टी जैन यांच्या मृत्यू प्रकरणात एक मोठा धक्कादायक आणि थरारक खुलासा झाला आहे. सुरुवातीला आत्महत्या आणि हुंड्यासाठी छळ म्हणून पाहिली जाणारी ही घटना, प्रत्यक्षात करोडो रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी रचलेला एक भयानक कट असल्याचं समोर आलं आहे.
तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
सृष्टीच्या मृत्यूच्या अवघ्या 20 दिवसांआधी तयार करण्यात आलेल्या मृत्यूपत्रानं या प्रकरणाचं वेगळंच बिंग फोडलं आहे. या भयानक कटामुळे सृष्टीला जीव गमवावा लागला. तर, तिच्या पतीला तुरुंगात जावं लागलं. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी शनिवारी सृष्टीचे आई-वडील आणि लहान बहिणीविरोधात फसवणूक व गुन्हेगारीचा गुन्हा दाखल केला असून, सोमवारी पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणाची माहिती दिली. Solapur Crime : ‘आई, मला मारु नको, मी शिकून खूप मोठी होईन’; मोठ्या मुलीची विनवणी ऐकली, पण धाकटीला निर्दयपणे संपवलं या प्रकरणाची सुरुवात 2 डिसेंबर 2025च्या रात्री झाली होती. सृष्टी जैन ह्या आपल्या आलिशान फ्लॅटवरून संशयास्पद परिस्थितीत खाली पडल्या. टॉवरवरुन कोसळल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सृष्टीचे वडील सुशील जैन यांच्या तक्रारीवरून मेघवाडी पोलिसांनी पती अमित जैन आणि सासरे राजेंद्र जैन यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मार्च 2026 मध्ये पोलिसांनी पती आणि सासऱ्याला अटकही केली होती. मात्र, चार्जशीट दाखल झाल्यानंतर न्यायालयानं दोघांचा जामीन मंजूर केला.
प्रॉपर्टीची एकमेव वारसदार तरुशी जैन
पती अमित जैन यांना इंदूरच्या दिवाणी न्यायालयाकडून एक नोटीस आली आणि या प्रकरणाला क्षणात नाट्यमय वळण मिळालं. ही नोटीस सृष्टीची लहान बहीण तरुशी जैन हिने पाठवली होती. या नोटीसमध्ये दावा करण्यात आला होता की, ‘सृष्टीने तिच्या मृत्यूच्या 20 दिवस आधी म्हणजेच 16 नोव्हेंबर 2025 रोजी एक अनरजिस्टर्ड मृत्यूपत्र तयार केलं होतं. या मृत्यूपत्रानुसार सर्व प्रॉपर्टीची एकमेव वारसदार तरुशी जैन आहे. Crime News : छळाला कंटाळून महिलेनं स्वत:ला संपवलं, चिमुकले आईच्या शोधात, तीन लेकरं मायेच्या छत्रछायेला पारखी; उपस्थितांचे डोळे पाणावले पती अमित जैन यांना या मृत्यूपत्रावर संशय आल्यानं त्यांनी तत्काळ या मृत्यूपत्रावरील स्वाक्षऱ्यांची फॉरेन्सिक तपासणी केली. फॉरेन्सिक अहवालात सृष्टीची स्वाक्षरी पूर्णपणे बनावट असल्याचं सिद्ध झालं. पोटच्या मुलीच्या मृत्यूचा गैरफायदा घेत तिची कोट्यवधींची मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी आई-वडील आणि लहान बहिणीनेच हा बनावट मृत्यूपत्राचा कट रचल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सृष्टीच्या आई, वडील आणि लहान बहिणीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा