Nashik Auto Rickshaw Fares: नाशिककरांचा रिक्षा प्रवासही आता महागणार आहे. आरटीओने किमान दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी आठ रुपयांनी, तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी पाच रुपयांनी दर वाढविण्यास मान्यता दिली आहे.
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: शहरासह जिल्ह्यात ऑटो रिक्षांसाठी सुधारित भाडेदर लागू करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना रिक्षा प्रवासासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने किमान दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी आठ रुपयांनी, तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी पाच रुपयांनी दर वाढविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता २७ ऐवजी ३५ रुपये, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपयांऐवजी २३ रुपये मोजावे लागणार आहेत.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसच्या प्रवास भाड्यात साडेतेरा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. त्यामुळे एसटीपाठोपाठ आता शहरांतर्गत रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशालादेखील महागाईची झळ बसणार आहे. खटुआ समितीच्या शिफारशीच्या आधारे सध्याचा महागाई निर्देशांक आणि वाढलेले इंधनदर विचारात घेऊन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत (आरटीओ) ऑटो रिक्षांसाठी सुधारित भाडेदर लागू करण्यात आले आहेत. या भाडेवाढीची अंमलबजावणी सुरू झाली असून, ऑटो रिक्षा परवानाधारकांनी भाडेमीटरचे री-कॅलिब्रेशन पाच सप्टेंबरपर्यंत करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे. भाडेमीटरचे री-कॅलिब्रेशन मुदतीत न करून घेतल्यास मागील ‘टॅरिफ कार्ड’ पाच सप्टेंबरपर्यंतच अनुज्ञेय राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Nashik Crime : दुसऱ्या बायकोचा जीव घेतला, आईला वाचवायला मध्ये पडलेल्या चिमुकल्यानेही प्राण गमावले, बापाचं टोकाचं पाऊल
‘परवानगी मिळाल्यास भाडेवाढ’
ओला, उबेर यांसारख्या मीटरवर चालणाऱ्या रिक्षांसाठी मीटर कॅलिब्रेशन अनिवार्य आहे. अनेक रिक्षाचालक मोबाइल अॅपच्या मदतीने मीटरप्रमाणे भाडे आकारतात. त्यामुळे अशा प्रवासीसेवेचा वापर करणाऱ्यांना यापुढे रिक्षा प्रवासाकरिता अधिक भाडे मोजावे लागणार आहे. शहरात अनेक रिक्षा अजूनही मीटरवर चालत नाहीत. रिक्षाचालक वेगवेगळ्या मागाँवर प्रवाशांकडून ठराविक भाडे आकारतात. अशा मार्गांवरील रिक्षा प्रवास भाडेदेखील ‘आरटीओ’ने निश्चित करून द्यावे, अशी मागणी रिक्षाचालकांच्या संघटनांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गांवर सेवा देणाऱ्या रिक्षा प्रवासभाड्यात येत्या काळात भाडेवाढ होऊ शकते, असे संकेत रिक्षाचालकांच्या संघटनांनी दिले आहेत.
Nashik News: आधी पत्नी आणि मुलाला संपवलं, नंतर पतीचाही जीव देण्याचा प्रयत्न; नाशिकमधील घटनेनं खळबळ
पुण्यातही रिक्षा भाडे वाढण्याची शक्यता
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) या आठवड्यात प्रलंबित असलेल्या भाडेवाढीला मंजुरी देण्याची शक्यता असल्याने, पुण्यात १ ऑगस्टपासून ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आरटीओ अधिकारी आणि विविध ऑटोरिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या १.५ किलोमीटरसाठीचे किमान भाडे सध्याच्या २५ रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतर प्रति किलोमीटर भाडे १७ रुपयांवरून २० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील आरटीए लवकरच यावर निर्णय घेईल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा