Mankhurd Bus Accident Injured: सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे सोमवारी बेस्ट बसच्या भीषण अपघातात एका ६५ वर्षीय ज्येष्ठाचा करूण अंत झाला. त्यासह सुमारे ९-१० प्रवासी जखमी झाले. हातावर पोट असलेल्या अनेक जखमी प्रवाशांकडे उपचारासाठीही पैसे नाहीत हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
म.टा. विशेष प्रतिनधी, मुंबई: ‘बसचालकाला आम्ही पुन्हा पुन्हा वेग कमी करण्यासाठी विनंती करत होतो. आम्हाला जिवाची काळजी वाटत होती. पण व्हिडीओ गेममध्ये गाडी चालवतात, तशी बस तो चालवत होता. शेवटी ज्याची भिती वाटत होती, तेच झाले. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि काही कळायच्या आत आम्ही बसमध्येच आपटलो आणि बाहेर फेकले गेलो…’ गोवंडी येथील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींच्या शब्दांमध्ये ही वेदना होती.
जखमींची अवस्था गंभीर
हातावर पोट असलेल्या या जखमींमध्ये कुणी रात्रपाळीहून घरी जात होते, तर कुणी आपल्या छोटेखानी व्यवसायासाठी नवी मुंबईच्या बाजारामध्ये फळे आणायला चालले होते. रुक्मिणी घोरपडे (५५) या रुग्णांची देखभाल करण्याचे काम करण्यासाठी बीएआरसी येथे जातात. बसचा अपघात झाला, तेव्हा त्या आतमध्येच इतक्या जोरात आदळल्या की, त्यांच्या नाकाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. हातावर पोट असलेल्या रुक्मिणी यांच्यापुढे आता कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, असा प्रश्न आहे. लता वाघेला (५५) यांचीही परिस्थिती वेगळी नाही. त्या नवी मुंबईहून फळे खरेदी करून मानखुर्दच्या भाजी बाजारामध्ये विकतात. त्यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले असून त्यासाठी तत्काळ शस्त्रक्रियेची गरज आहे.
Mumbai BEST Bus Accident: भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात
महाराष्ट्र नगरमध्ये राहणारा संकेत नाकती (२५) हा रात्रपाळीहून घरी जात होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर, संकेत हा त्याच्या आईचा आधार आहे. अपघातामध्ये त्याच्या डोक्याला खोल जखम झाली असून नऊ टाके पडले आहेत, पायालाही फ्रॅक्चर घातले असून पुन्हा कधी चालता येईल हे त्याला माहीत नाही. आईला हृदयविकाराचा त्रास असल्याने तिची काळजी कोण घेईल, या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी येते. गणेश पटेल (२५) हा मूळचा राजस्थानचा असून त्याचे कुटुंब तिथेच राहते. गणेश कोपरखैरणेत लहानसे दुकान चालवतो. तिथेच जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या गणेशच्या नाकाला जोरात मार लागला आहे. हा फटका इतका जबरदस्त होता की, त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
Samruddhi Expressway Wardha Accident: लेकीला MBAसाठी पुण्यात सोडून घरी निघाले, वाटेत ट्रकच्या धडकेत सहा जणांचा करूण अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
‘खिशात फक्त दोनशे रुपये आहेत…’
अपघातामध्ये शिवमंगल मैती हेही गंभीर जखमी झाले आहेत. रात्रपाळी संपवून ते घरी परत जात होते. ते बसमधून उतरण्यासाठी दाराजवळ असतानाच, भीषण अपघात झाला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. खांद्याचे हाड जागेवरून निखळल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. हे हाड पूर्ववत बसावे यासाठी त्यांना खांद्याचा पट्टा लावायला लागणार आहे. अन्यथा हाड पुन्हा निखळण्याची भिती आहे. ‘त्या पट्ट्याची किंमत दोन हजार रुपये आहे. आता माझ्या खिशात फक्त दोनशे रुपये आहेत… पट्टा कुठून आणू?’ असे सांगत शिवमंगल ओक्साबोक्सी रडायला लागले. शताब्दी रुग्णालयामध्ये ऑनड्युटी असलेल्या डॉक्टरांनीही ‘रुग्णालय काही मदत करू शकत नाही,’ असे म्हणत हात वर केले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा