Cyber Crime: पुणे शहरात उघडकीस आला सायबर फसवणुकीचा प्रकार , पाच शहरातील गुन्हे उघड. मुंढवा ,फुरसुंगी, काळेपडळ, विमानतळ आणि खराडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल.
तपासात मुंढवापोलिस ठाण्याच्या हद्दीतील येस बँकेच्या खात्यातून देशातील सात नागरिकांच्या ४३ लाख एक हजार रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित व्यवहार झाल्याचे समोर आले. फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात ३४ लाख रुपये जमा करून ते पुढे इतर खात्यांत वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून ४६ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खात्यातून एक कोटी २० लाख रुपयांची रक्कम फिरविण्यात आली होती. खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ बडोदाच्या खात्याद्वारे देशातील सात नागरिकांची तीन कोटी ६० लाख ५२ हजार रुपयांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
Siya Goyal : केतन तुझ्यासाठी हिरो नंबर वन का? अँकरचा प्रश्न, सियाची बेमालूम थाप, दोन खोट्या प्रशंसा
राष्ट्रीय सायबर तक्रार प्रणालीवर नोंद झालेल्या प्रकरणांतील आर्थिक व्यवहारांची साखळी तपासताना ही संशयास्पद बँक खाती समोर आली. त्यानंतर खातेदारांची माहिती, संबंधित बँका आणि व्यवहारांची पडताळणी करून प्रकरणे पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.
‘म्युल खाते’ म्हणजे काय ?
सायबर गुन्हेगार फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वतःच्या खात्यात न घेता इतरांच्या नावावरील बँक खात्यांचा वापर करतात, अशा खात्यांना ‘म्युल खाते’ म्हटले जाते. या खात्यांमध्ये रक्कम जमा होताच ती काही मिनिटांतच इतर अनेक खात्यांमध्ये वर्ग केली जाते. त्यामुळे मूळ आरोपींपर्यंत पोहोचणे अवघड होते. अशा खातेदारांवरही सायबर गुन्ह्यांत सहकार्य केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
Moshi Accident: मोशी दुर्घटनेतील अनधिकृत बांधकामावर मौन; 9 बळी जाऊनही कारवाई नाही, महापालिकेचे दुर्लक्ष
मालकाकडे चोरी करणाऱ्याला अटक
पुणे : कर्जाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी अनेक वर्षे मालकाकडे विश्वासाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वतःच्या जावयासह साथीदाराच्या मदतीने मालकाच्या सहा लाख ५० हजार रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला. स्वारगेट पोलिसांनी १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून तिघांना अटक करून चोरीची संपूर्ण रक्कम जप्त केली. जयंत रजनीकांत शहा (५९), सोहेल अलीअहमद खान (३५) आणि तौसीफ मुकीद बागवान (३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नऊ जुलैला गुलटेकडी येथील ‘हर्ष रेसिडेन्सीज’ सोसायटीबाहेर ही घटना घडली होती. व्यावसायिक घरी परतल्यानंतर त्यांचा वॉचमन रोकड असलेली बॅग घेऊन आत जात असताना आरोपींनी ती हिसकावून दुचाकीवरून पलायन केले होते.
