Pune Student kidnapped in Nagpur : तरुणी पुण्याहून बसने नागपुरात आली. वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधत तिने ‘नागपुरात काही काम आहे. सायंकाळपर्यंत घरी येते’, असे कळवले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : इन्स्टाग्राम फ्रेंडने २२ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्या वडिलांकडे खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ‘मुलगी सुखरूप हवी असेल, तर ५० हजार रुपये द्या, खंडणी न दिल्यास तिला ठार मारेन’, अशी धमकी आरोपीने दिली होती. याबाबत कळताच ग्रामीण पोलिसांनी रामटेकमधील नगरधन परिसरात सापळा रचून तरुणीची सुटका करीत अपहरणकर्त्याला अटक केली.
पुण्यात राहणाऱ्या तरुणीची आरोपीशी ऑनलाईन ओळख
जिशान अयुब अन्सारी (वय २१, रा. बाबुबिघा, जि. बुद्धगया, बिहार) असे अटकेतील अपहरणकर्त्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात राहणारी तरुणी पुण्यात नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला आहे. तिचे वडील शेती करतात. महिनाभरापूर्वी तिची जिशानसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. Crime News : 8 वर्षांच्या रिलेशननंतर प्रेमभंग, मुंबईत तरुणीने जीवन संपवलं, कुटुंबीयांनी बॉडी प्रियकराच्या घरी नेली, मंगळसूत्र घालून अंत्यविधी करण्याची मागणी
तरुणीचा मोबाईल घेऊन वडिलांना धमकी
शनिवारी सकाळी तरुणी पुण्याहून बसने नागपुरात आली. वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘नागपुरात काही काम आहे. सायंकाळपर्यंत घरी येते’, असे तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर जिशानने गणेशपेठ परिसरात तिला गाठले. आमिष दाखवून तिला सोबत रामटेकला नेले. येथे त्याने तरुणीचा मोबाइल घेतला. त्यानंतर जिशानने तरुणीच्या वडिलांच्या मोबाइल संपर्क साधला. ‘मुलगी सुखरूप हवी असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील. खंडणी न दिल्यास तिला ठार मारेल’, अशी धमकी जिशानने दिली.
मी अस्वस्थ, बीडमध्ये काहीही झाल्यास माझं नाव घेतलं जातं; धनंजय मुंडेंची खंत
पोलिसांनी लगोलग तरुणीला पकडले
तरुणीचे वडील घाबरले. त्यांनी लगेच यवतमाळ पोलिसांना माहिती दिली. यवतमाळ पोलिसांनी नागपूर ग्रामीण पोलिसांना कळविले. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तरुणीला हुडकून काढत अपहरकर्त्याला बेड्या ठोकण्याचे आदेश दिले. Atul Pawar : अतुल साप चावल्याने गेला! स्कूल संचालकाच्या बायकोचे स्कूल बसचालकाशी संबंध, पतीचा काटा काढला, पण पवार कुटुंबाने छडा लावलाच अपर अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हेशाखा, रामटेक पोलिस व सायबर शाखा पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे दोघांचा शोध सुरू केला. दोघेही नगरधन परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून जिशानला अटक करीत तरुणीची सुटका केली. जिशानने तिचे अपहरण करून खंडणी कशासाठी मागितली, याचा तपास पोलिस करीत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा