Nashik Bhavali Dam Tourists Attacked Case: भावली धरण परिसरात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करून कडेकोट सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी तैनात केल्याने कोणताही गैरप्रकार घडला नाही.
इगतपुरी येथील भावली धरण परिसरात महिला पर्यटकांसमोर शिट्टी वाजवल्यामुळे झालेल्या वादातून तरुणांनी सात किलोमीटर पाठलाग करून पर्यटकांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार गत आठवड्यात घडला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशयितांवर खुनाचा प्रयत्नासह गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंदवला. या घटनेनंतर रविवारी (दि. १९) सकाळपासून पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’ सुरू होता. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर अधीक्षक विमला एम. यांच्या सूचनेनुसार इगतपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्याम बळप यांच्या पथकाने रविवारी सकाळीच परिसराचा ताबा घेतला. त्यांच्या मदतीला मुख्यालयातून दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण नाकाबंदी करून करण्यात आले.
Girish Mahajan: ठाकरेसेनेत तुम्ही तिघंच जण राहाल! गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला
भावली धरण परिसरात पर्यटकांसह प्रत्येकाची वाहने तपासण्यात आली. हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप देत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला. दरम्यान, गत आठवड्यात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या बारा संशयितांना अटक झाली आहे. त्यांची रवानगी न्यायालयाने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
Nashik Crime : वैष्णवी आवारे मृत्यू प्रकरण; दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग, बॉयफ्रेंडला कळताच नको ते केलं, नाशिकमधील घटनेचा उलगडा
भावली धरण परिसरासह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर पोलिसांची नजर आहे. पर्यटकांनी निर्धास्तपणे व नियमांनुसार पर्यटनस्थळांवर जावे. कोणताही संशय आल्यास त्वरित ‘डायल ११२ ‘वर संपर्क साधावा. -डॉ. डी. एस. स्वामी, पोलिस अधीक्षक
Nashik Crime : रात्रीच्यावेळी रुमवर जाताना अचानक हल्ला, नाशकात तरुणाने PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; घटनेला प्रेमप्रकरणाची किनार
ढापा धोकादायक
पाथर्डी : इंदिरानगर येथील कलानगर चौकातील फूटपाथवरील गटारीचा ढापा धोकादायक स्थितीत असून, त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. या ढाप्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असून, अपघात होण्याची भीती आहे. कलानगरहून राजीवनगरकडे जाणाऱ्या शंभरफुटी रस्त्यालगत पादचारी मार्गावरील गटारीचा ढापा जमिनीपेक्षा उंच झाल्याने दुर्घटनेचा धोका वाढला आहे. त्यामुळे परिसरातील ढाप्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी गौरव सोनार, वैभव गणोरे आदींनी केली आहे.
