Navi Mumbai News: नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक घटना घडली असून कुटुंबाची धाकधूक वाढली आहे.
धक्कादायक! नवी मुंबईतील तरुणाला नोकरीच्या आमिषाने बँकॉकला नेलं, नंतर भलतंच घडलं; फोनवरील संभाषणाने गूढ वाढले!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, पनवेल: परदेशातील चांगल्या नोकरीच्या आमिषाला बळी पडून तळोज्यातील एका तरुणाच्या आयुष्याला भीषण वळण लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीच्या आमिषाने सदर तरुणाला प्रथम बँकॉकला नेण्यात आले आणि नंतर म्यानमारमध्ये एका टोळीच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुलाच्या सुटकेसाठी कॅन्सरग्रस्त आईचे मंगळसूत्र आणि दागिने विकून तब्बल आठ लाख रुपये उभे करून दिले, तरीही हा तरुण परदेशातच अडकून असल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळोज्यातील २३ वर्षीय तरुणाला काही एजंटांनी आकर्षक नोकरीचे आमिष दाखवत परदेशात पाठवले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, बँकॉकला पोहोचल्यानंतर त्याच्याशी मोबाईलवरून संपर्क केला असता संभाषणात बदल जाणवू लागला आणि नंतर त्याला जबरदस्तीने म्यानमारमध्ये नेऊन एका टोळीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली.
एकीकडे मुलाच्या जीवाची चिंता, तर दुसरीकडे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईचे उपचार. अशा कठीण परिस्थितीतही कुटुंबाने हार मानली नाही. आईचे मंगळसूत्र, दागिने आणि घरातील मौल्यवान वस्तू विकून संबंधितांकडे सुमारे आठ लाख रुपये पाठवल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही मुलाची सुटका न झाल्यामुळे त्यांची निराशा आणखी वाढली आहे. तरुणाचे वडील राजेश यांनी पोलीस, शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधी आणि विविध यंत्रणांकडे वारंवार मदतीची याचना केली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “आमचा मुलगा जिवंत परत आणा,” एवढीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. मानवी तस्करीच्या संशयातून या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून साहिलची सुरक्षित सुटका करण्यासाठी केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय, महाराष्ट्र पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणांनी तातडीने समन्वय साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मानवी तस्करी, खंडणीची मागणी आणि आर्थिक व्यवहारांबाबतचे आरोप हे संबंधित कुटुंबीयांनी केलेले असून, त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. परंतु एका कुटुंबात घडलेल्या या वेदनादायी प्रसंगात संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून साहिलला सुरक्षित मायदेशी परत आणावे, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा