• Sun. Jul 19th, 2026
    Dharashiv News : भात वाढल्यानंतर चक्क अळ्या, FDAला कळताच शाळेत अधिकारी धडाधड पोहोचले; जि.प.शाळेतील संतापजनक प्रकार

    Dharashiv FDA Raid News : पारा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    जिल्हा परिषद शाळा शालेय पोषण आहार अळ्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रहीम शेख, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील सोयाबीन भातामध्ये अळ्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनानं रात्री उशिरापर्यंत शाळेत जाऊन अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले.

    शिक्षकांमध्ये मोठी खळबळ

    वाशी तालुक्यातील पारा गावातील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार तयार करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना सोयाबीन भात वाढल्यानंतर त्यामध्ये अळ्या असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा शाळेत भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली. तसेच अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesRavindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार? पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांचे पथकं मागावर; नेमकं प्रकरण काय?
    या घटनेमुळे शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित अशा निष्काळजीपणावर जबाबदारांवर कोणती कारवाई होणार, याकडे आता पालकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.

    PM रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड

    जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह कार नदीत टाकून आत्महत्या केली होती. शुक्रवारी सकाळी मुदखेड तालुक्यातील पुनेगाव नदी पुलावर ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत आता मोठी आणि मनाला चटका लावणारी माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षक पित्याने आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलांच्या पोटात आणि छातीत चाकू भोसकून खुन केला. त्यानंतर मृतदेह गाडीत ठेवून स्वतः गाडी भरधाव वेगाने चालवत 50 फूट खोल गोदावरी नदीत टाकली. निर्दयी बापानेच निष्पाप मुलांची हत्या केल्याची बाब उघडकीस आल्यानं संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी मयत वडिलांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा