चाळीसगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला आमदार किशोर पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे. तर मंगेश चव्हाण हे कार्यालय चाळीसगावात व्हावे यासाठी आग्रही आहेत. यामुळे आता महायुतीच्या दोन्ही आमदारांमध्ये संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघात चाळीसगाव येथे अप जिल्हाधिकारी कार्यालय होत आहे. पण याला पाचोरा भडगावचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी पक्षाच्या बैठकीत तीव्र विरोध दर्शला आहे. यासाठी त्यांनी आंदोलन छेडण्याचे जाहीर केले आहे. एकंदरीत दोघांच्याही वर्चस्वाच्या लढाईत महायुती आता वाद निर्माण झाला आहे. पाचोरा येथे शुक्रवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार किशोर पाटील यांनी सरकारला आणि प्रशासनाला हा इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
“पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील नागरिकांसाठी जळगाव येथील जिल्हास्तरीय कार्यालये अधिक सोयीची आहेत. चाळीसगाव हे भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याने तेथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यास नागरिकांची प्रचंड गैरसोय होईल. त्यामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यांची प्रशासकीयदृष्ट्या जोडणी कोणत्याही परिस्थितीत चाळीसगावशी होऊ देणार नाही”, असा पवित्रा किशोर पाटील यांनी घेतला आहे.
“अपर जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगावला करण्याचा निर्णय झाल्यास याविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आयुक्त तसेच संबंधित सचिव यांना निवेदने सादर केली जाणार”, असे त्यांनी सांगितले.
आमदार किशोर पाटलांना भीती कसली?
शेजारच्या मतदारसंघात एवढे मोठे शासकीय कार्यालय गेल्याने आणि आपल्या भागातील जनतेला तिथे चकरा माराव्या लागल्यास, त्यांच्या स्वतःच्या राजकीय वर्चस्वाला आणि प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, याची पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांना पूर्ण जाणीव आहे.
स्थानिक पातळीवरचं राजकारण
या वादाला स्थानिक राजकीय संघर्षाचीही पार्श्वभूमी लाभली आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने हे कार्यालय चाळीसगावला नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. आगामी नगरपालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघांतील आमदारांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. यापूर्वीही स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही बाजूंचे नेते आमने-सामने आले होते, आणि आता या शासकीय कार्यालयाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
मंगेश चव्हाण आग्रही
जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगावला मंजूर करून आणण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण हे आग्रही आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच या हालचालींना वेग आला आहे. जर हे कार्यालय तिथे झाले, तर त्याचे मोठे श्रेय मंगेश चव्हाण यांना मिळेल, ज्यामुळे त्यांची राजकीय पकड अधिक मजबूत होईल.
कोण यशस्वी होणार?
आमदार मंगेश चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नेते आहेत. तर आमदार किशोर पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत. दोघेही आमदार मंत्र्यांच्या जवळचे असल्याने आता नेमके चाळीसगावला मंगेश चव्हाण यांची ताकद लागते की, आमदार किशोर पाटील यांचे आंदोलन यशस्वी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा