Nanded Zilla Parishad Teacher Ends his Life with Two Children : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्याचदरम्यान, नांदेड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
नांदेड गोदावरी नदी शिक्षकाची मुलांसह आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं आपल्या दोन मुलांसह पुलावरून गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड शहरालगत असलेल्या आमदुरा पुलाजवळ आज शुक्रवारी सकाळी ही मन हेलावणारी घटना घडली.
आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी शिक्षकाने व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं. गट शिक्षण अधिकाऱ्यांसह इतर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मुलासह आत्महत्या करीत आहे, असं स्टेट्स ठेवलं. सुमित मोरे, मुलगा आणि मुलगं असं मृत पावलेल्यांची नावे आहेत. शिक्षकानं मुलांसह आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. Jalna Crime : आक्षेपार्ह फोटोवरुन ब्लॅकमेल, दोन तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्यांची खंडणी, रीलस्टार महिलेसह तिघांना अटक
कोण आहेत सुनील मोरे?
मृतक सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील टेंबर गावचे रहिवासी असून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षकपदी कार्यरत होते. मागील काही वर्षापासून ते पत्नी आणि दोन मुलांसह सांगवी गोपाळनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. आज सकाळी दोन्ही मुलांना कारमध्ये बसून ‘शाळेत सोडतो’ म्हणून घरून निघाले. सकाळी सात वाजेच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील पुणे गाव परिसरातील आमदुरा घाटावरुन गोदावरी नदीपात्रात गाडी टाकून चिमुकल्यांसह त्यांनी जीवनयात्रा संपवलीयं.
अधिकाऱ्यांविरोधात माझ्याकडे अनेक पुरावे
दोन वर्षापासून हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुखाकडून वेगवेगळ्या कारणांवरून चौकशी करण्यात आली, त्यांच्या या जाचाला कंटाळलो असल्याचं शिक्षकाने घटनेपूर्वी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं. स्टेट्समध्ये अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख देखील केला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एसडीआरएफच्या पथकाने कार आणि कारमधील तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. Pune News : डीएसकेंच्या जप्त मालमत्तांच्या लिलावाला विलंब, ठेवीदार अस्वस्थ; प्रॉपर्टी ‘ॲब्सोल्यूट’ घोषित म्हणजे नेमकं काय? या घटनेनं शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं आपल्या चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे घटनेपूर्वी शिक्षकाने आपल्या एका सहकार्यासोबत फोनवर संभाषण देखील केलं. समोरील व्यक्तीने ‘आपण सोबत लढा देऊ, कोणताही निर्णय घेऊ नका’, अशी विनवणी केली. ‘अधिकाऱ्यांविरोधात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत’, असं सुनील मोरेंनी देखील संभाषणात म्हटलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा