Sunetra Pawar meeting : देवेंद्र फडणवीस यांची सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी जी बैठक झाली, त्याविषयी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि त्यांचे खासदार सुपुत्र पार्थ पवार यांनाच पूर्वकल्पना नव्हती, अशी माहिती समोर येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह चौघांची बैठक झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु या भेटीबाबत राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि त्यांचे खासदार सुपुत्र पार्थ पवार यांनाच आधी कल्पना नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांची बुधवारी दुपारी देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवारांनी तटकरेंना जाब विचारल्याचे समोर आले आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
देवगिरीवरील बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह छगन भुजबळ, अनिल पाटील आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीबाबत सुनेत्रा पवारांकडून सुनील तटकरे यांच्याकडे विचारणा करण्यात आली. ‘संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी समर्थन देणार आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगळा अर्थ काढू नये, म्हणून याबाबत कल्पना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच बोलावले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही’ अशी माहिती तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना दिल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. Uddhav Thackeray : वाईट काळ संपेल, चांगले दिवस येतील, उद्धव ठाकरेंची ग्वाही; नगरसेवकांकडून एकनिष्ठतेची शपथ मुख्यमंत्र्यांनीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बैठकीसाठी वर्षावर बोलावलं होतं का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मात्र जर मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचा संदेश द्यायचा होता, तर त्यांनी पक्षप्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांना कल्पना का दिली नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे.
फडणवीस-जयंतराव भेट, डिलिमिटेशन बिल ते NDA ला पाठिंबा; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
Dr Mehul Rathod : 11 वाजता घरुन निघाले पण फोन उचलेनात; पत्नी-सहकाऱ्यांची शोधाशोध, लातूरच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञाची बॉडी साडेचारला गाडीत सापडली
सुनेत्रा पवार अंधारात का?
मंगळवारी रात्री अचानक जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे वर्षा निवासस्थानी पोहोचल्याच्या बातम्या येताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. परंतु या बैठकीविषयी माहितीच नसल्याने सुनेत्रा पवार यांनी दुसऱ्या दिवशी तातडीने वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. मुख्यमंत्र्यांनी खरोखर अशी बैठक बोलावली असेल, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अंधारात का ठेवण्यात आले, अशी चर्चा सुरु झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला पक्षातूनच विरोध झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ही घडामोड घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा