• Fri. Jul 17th, 2026
    ११ वाजता घरुन निघाले पण फोन उचलेनात; पत्नी-सहकाऱ्यांची शोधाशोध, लातूरच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञाची बॉडी साडेचारला गाडीत सापडली

    Latur Cardiologist Doctor Mehul Rathod Death : डॉ मेहुल राठोड यांनी गुंगीचे औषध घेत आपली जीवनयात्रा संपवली असून प्रथमदर्शनी त्यांनी आत्मघात केल्याचे सांगितले जाते, परंतु काही जणांनी यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर : सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आयुष्याची अखेर केल्याच्या घटनेला काही महिने उलटले असतानाच आता लातूर शहरातील हृदयरोग तज्ञानेही जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ मेहुल राठोड यांनी गुंगीचे औषध घेत आपली जीवनयात्रा संपवली. प्रथमदर्शनी त्यांनी आत्मघात केल्याचे सांगितले जाते, मात्र काही जणांनी यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे.

    लातूरमधील ४५ वर्षीय प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ मेहुल राठोड यांनी बुधवारी दुपारी आयुष्य संपवल्याचं समोर आलं. आपल्या हॉस्पिटलपासून लांब जात त्यांनी कारमध्ये गुंगीचे औषध घेत जीव दिल्याची माहिती आहे. अद्याप त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही.

    Tukaram Mundhe : २.३ कोटी लिटर भेसळयुक्त दूध, डिटर्जंट पावडर, पाम तेलाचा वापर, FDA ने केला पर्दाफाश

    लातूर बार्शी रोडवर डॉक्टरांचे हॉस्पिटल

    मेहुल राठोड यांचं बार्शी रोड येथे एम जे हॉस्पिटल आहे. बुधवारी दुपारी ते स्वतःची इनोव्हा गाडी घेऊन आंबेजोगाई रोड भागात गेले. या ठिकाणी गाडीतच त्यांनी गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन घेत आत्मघात केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यांच्या कारमध्ये इंजेक्शन काही औषधाच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत. घरातून ते सकाळी अकरा वाजताच्या सुमारास निघाले होते. बुधवारी दुपारी दीड वाजल्यापासून या भागात ही गाडी दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे.
    Maharashtra TimesBetul Duggu Dog : मृत्यूही वेगळं करु शकला नाही; 15 वर्षांची साथ, मालकाच्या निधनाने डुग्गूही कावराबावरा; अंत्ययात्रेत चालतानाच श्वास थांबला, बाजूबाजूला अखेरचा निरोप

    दुपारपासूनच डॉक्टर फोन उचलत नव्हते

    डॉक्टर राठोड यांच्या कुटुंबाकडून आणि दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना दुपारपासून फोन लावला जात होता. ते फोन उचलत नसल्याने शोधाशोध सुरु झाली. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास त्यांची गाडी आंबेजोगाई रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांची पत्नी प्रियांकाही डॉक्टर असून माहिती मिळताच त्या आणि डॉक्टरांच्या काही सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
    Maharashtra TimesDhurbe Elephant : आधी आई-वडील, आता सून-नातू; एकाच हत्तीने 14 वर्षात बोटे कुटुंबातील चौघांना संपवलं, घर बदलून नदीपार जाऊनही शोधलं
    डॉक्टर मेहुल राठोड यांना त्या अवस्थेत पाहून सगळेच घाबरले. मात्र त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. इतर माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. डॉ राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यविधी झाल्यानंतर गुरुवारी कुटुंबीयांकडे चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा