Tukaram Mundhe, Milk Adulteration : दुधात पाम ऑईल, रसायनं, अगदी शाम्पू आणि डिटर्जंटही वापरलं जात असल्याचा धक्कादायक दावा तुकाराम मुंढे यांनी केला आहे. ग्राहकांनी दूध घेताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, याबाबतही त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दुधातील भेसळीबाबत एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठे दावे केले आहेत. त्यांनी सिंथेटिक दूध कसं तयार होतं , त्यात काय मिसळलं जातं आणि ग्राहकांनी दूध घेताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. मुंढे म्हणाले, काही ठिकाणी पाम ऑईल, स्किम्ड मिल्क पावडर आणि विविध रसायनांचं मिश्रण करून दूध तयार केलं जातं. गाईचं दूध तयार करण्यासाठी सुमारे १५ रुपये, तर म्हशीचं दूध तयार करण्यासाठी ३० रुपये खर्च येतो. याहून धक्कादायक म्हणजे काही कारवायांमध्ये शाम्पू, साबण आणि डिटर्जंटचाही वापर आढळला. हे दूध नसून पूर्णपणे कृत्रिम आणि बेकायदेशीर उत्पादन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
डेअरींचीही तितकीच जबाबदारी
शेतकऱ्याकडून दूध घेताना त्याची तपासणी करणं प्रत्येक डेअरी आणि दूध संकलन केंद्रासाठी बंधनकारक आहे, असं मुंढे म्हणाले. दूध निकृष्ट किंवा असुरक्षित असेल, तर ते स्वीकारूच नये. मोठ्या डेअरी प्लांटनंही टँकरमधील दुधाची तपासणी करूनच ते स्वीकारायला हवं. ही कायदेशीर जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं.
Crime News : महाराष्ट्र पोलिसांची धडाकेबाज कारवाई, माफियांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कला दणका, 6 जणांना बेड्या
ब्रँडवर आंधळा विश्वास नको
ब्रँडेड दूध म्हणजे ते शुद्धच असेल, असं नाही, असं मुंढे म्हणाले. दूध घेताना पॅकेटवरील फॅट, एसएनएफ, घटक, पॅकिंग आणि एक्सपायरी डेट नक्की तपासा, असा सल्ला त्यांनी दिला. दुधावर जास्त साय आली म्हणजे ते चांगलं असतंच, हा गैरसमज आहे. काही वेळा युरियामुळेही जास्त साय येऊ शकते, असा दावा त्यांनी केला. त्यांनी ‘मुंबई तक’ या वाहिनीशी बोलताना हे सगळे दावे केले आहेत.
महाराष्ट्रातील ३२ टक्के नमुने निकृष्ट
तुकाराम मुंढे यांच्या मते, नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील जवळपास ३२ टक्के दुधाचे नमुने निकृष्ट किंवा असुरक्षित आढळले आहेत. एफडीएच्या कारवाईनंतर अनेक अवैध डेअरी आणि कलेक्शन सेंटर्स बंद झाली आहेत. लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कायद्यात थेट जन्मठेपेचीही तरतूद असून अशा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा