• Tue. Jul 14th, 2026

    अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 14, 2026
    अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : राज्यातील अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत सर्वंकष विचार करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या पदस्थापनेबाबतच्या बैठकीत ग्राम विकास मंत्री गोरे बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, तसेच शिक्षक शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    ग्राम विकास मंत्री गोरे म्हणाले की, राज्यातील १३ जिल्हा परिषदांमध्ये अवघड क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना नियमानुसार तीन वर्षांनंतर बदलीची संधी दिली जाते. गेल्यावर्षी राज्यभरात सुमारे ६६ हजार शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेमुळे यंदा अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगून शिक्षकांच्या हिताचा विचार करून शासनाकडून योग्य आणि सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री गोरे यांनी सांगितले.

    अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासन संवेदनशील असल्याचेही मंत्री गोरे म्हणाले. यावेळी शिक्षकांच्या अडचणी, विद्यमान नियम तसेच जनगणनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. शिक्षकांच्या विविध मागण्या व पदस्थापनेसंदर्भातील मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

    0000

    वंदना थोरात/विसंअ

    विजयवाडी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्धतेची कार्यवाही तातडीने  करा – ग्राम विकास  मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
    महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
    राज्यातील १९ महाविद्यालयांमध्ये १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed