• Tue. Jul 14th, 2026

    उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयास सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर व मा खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांची भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 14, 2026
    उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयास सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर व मा खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांची भेट – महासंवाद

    ठाणे,दि. १४ (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर व मा. खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी आज उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी , आमदार मा. श्री. कुमार आयलानी, आमदार मा. श्री. बाळाजी किणीकर, आमदार मा. सौ. सुलभा गायकवाड, उल्हासनगर महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. अर्धिनी निकम, आयुक्त श्री. मनीषा आहाळे, सहसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. सुनिता गोल्हईत, उपसंचालक डॉ. अशोक नांदपुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

    भेटीदरम्यान मंत्री महोदयांनी रुग्णालयातील सुविधा, सुरू असलेली विकासकामे आणि भविष्यातील विस्तार योजनांचा आढावा घेत रुग्णांना अधिक दर्जेदार, आधुनिक व तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

    मंत्री महोदयांचे प्रमुख निर्देश :

    २०२ खाटांवरून ४०० खाटांपर्यंत रुग्णालयाचा विस्तार करण्याबाबतचा शासन स्तरावरील प्रस्ताव पाठपुरावा करणे.

    ५० खाटांच्या क्रिटिकल केअर ब्लॉक (CCB) चे बांधकाम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

    मध्यवर्ती रुग्णालयात २० खाटांचे अतिदक्षता विभाग (ICU) सुरू करण्यासाठी प्रस्ताव त्वरित सादर करावा.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ व मध्यवर्ती रुग्णालय यांच्यातील समन्वय करार (MoU) लवकरात लवकर पूर्ण करावा.

    रुग्णालयाच्या ताब्यातील जमिनीची मोजणी व नावावर हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आवश्यक असल्यास तात्काळ मोजणी शुल्क भरून प्रक्रिया गतीमान करावी.

    एमआरआय युनिट सुरू करण्यासाठी शासनस्तरावरील मंजुरी मिळताच काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी.

    मध्यवर्ती रुग्णालयात कॅथलॅब (Cath Lab) सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे सादर करावा.

    मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व विकासकामांचा नियमित पाठपुरावा करून निर्धारित कालावधीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच उल्हासनगर व परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    00000000000

     

    विजयवाडी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्धतेची कार्यवाही तातडीने  करा – ग्राम विकास  मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
    महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
    अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed