Longest Serving Chief Minister Of Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षे आणि २२१ दिवसांचे म्हणजेच एकूण २ हजार ४१२ दिवसांचे कामकाज हाताळले होते. १२ जुलै रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकूण सहा वर्षे सात महिन्यांचा कालावधी पूर्ण केला आहे. हा कालावधी एकूण २ हजार ४३० दिवसांचा होतो. या निमित्ताने रवींद्र चव्हाण यांनी फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
Maratha Reservation: ‘एसटी’ व्यक्तीही राष्ट्रपतिपदी; ‘मराठा आरक्षण’प्रश्नी सरकारचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद
वसंतराव आणि विलासराव पुढे
फडणवीस यांनी यापूर्वीच वसंतदादा पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मनोहर जोशी, शंकरराव चव्हाण यांना मागे टाकले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा २ हजार ६८६ दिवसांचा तर वसंतराव नाईक यांचा ४ हजार ९६ दिवसांचा कार्यकाळ राहिला आहे. भविष्यात फडणवीस यांनी देशमुख यांचा हा कार्यकाळ मागे टाकल्यास ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील.
मुख्यमंत्र्यांचा १२ जुलैपर्यंतचा कार्यकाळ
पहिला – ३१ ऑक्टोबर २०१४ – १२ नोव्हेंबर २०१९ = १,८३९ दिवस
दुसरा – २३ नोव्हेंबर २०१९ – २८ नोव्हेंबर २०१९ = ६ दिवस.
तिसरा – ५ डिसेंबर २०२४ – १२ जुलै २०२६ = ५८५ दिवस.
व्हायरल तापाने मुंबई फणफणली; गॅस्ट्रो, डेंग्यूच्या रुग्णांत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको!
वसंतराव नाईक यांचा कार्यकाळ —- ४,०९६ दिवस
विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ —- २,६८६ दिवस
देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ —- २,४३० दिवस
