• Mon. Jul 13th, 2026

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना थेट पक्षातूनच विरोध? राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर ज्येष्ठ नेत्याचा आक्षेप

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना थेट पक्षातूनच विरोध? राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर ज्येष्ठ नेत्याचा आक्षेप

    सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्याने आक्षेप घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित नेत्याने वकिलांमार्फत थेट नोटीस पाठवली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पक्षातूनच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    ज्येष्ठ नेत्याने बजावली नोटीस

    सच्चिदानंद सिंह यांनी 9 जुलैला नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही नोटीस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव म्हणून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना बजावण्यात आली आहे.

    नोटीसमध्ये काय म्हटलंय?

    या नोटीसमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे ती निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत स्वतंत्र आणि नि:पक्षपाती असा निवडणूक अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तोवर राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारीत ॲाफिस बेअररची यादी ही रद्द समजावी, असेही नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.

    सुनेत्रा पवारांच्या पक्षात काहीतरी वेगळं घडतंय?

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरही सुनेत्रा पवार यांनी निवड सर्वानुमते करण्यात आली. याबाबत रितसर पक्षाची बैठक बोलावण्यात आली. तिथे सर्वांच्या सहमतीने सुनेत्रा पवार यांची रितसर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

    या दरम्यान निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांचे पद नमूद नसल्याने पक्षाच काहीतरी वेगळ्या घडामोडी घडत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मधल्या काळात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध पक्षातील इतर नेते आणि कार्यकर्ते असे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने आक्षेप घेतल्याने पक्षात सारं कारी आलबेल आहे ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    पक्षात सध्या अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसचे अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे पवार कुटुंबियांचं पक्षात महत्त्वाचं स्थान आहे. असं असताना सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर पक्षातून आक्षेप घेण्यात आल्याने हा विषय चर्चेला कारण ठरत आहे. वातावरण देखील तयार झाले होते. याबाबत सुनील तटकरे यांनी बैठकीत खंत व्यक्त केली होती. यानंतर सुनेत्रा पवारांनी बैठक घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. असं असलं तरी आता त्यांच्याच अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा